सुमेधाताई चिथडे यांचे रविवारी व्याख्यान

सुमेधाताई चिथडे यांचे रविवारी व्याख्यान

Published on

- rat११p४.jpg -
OP२४N३०८५६
सुमेधा चिथडे

''राष्ट्राय स्वाहा, इदं न मम'' वर
चिथडे यांचे रविवारी व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : ''राष्ट्राय स्वाहा, इदं न मम'' म्हणत सियाचीन येथील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लान्टच्या उभारणी करणाऱ्या सुमेधाताई चिथडे यांचे व्याख्यान येत्या रविवारी (ता. १५) येथील उर्मी ग्रुपतर्फे आयोजित केले आहे. रंजन मंदिर सभागृहात सायंकाळी पाच वाजता हे व्याख्यान होईल.
देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचं आपण देणं लागतो. जात, धर्म, वंश, पंथ, भाषा यापलीकडे जाऊन काम करणारी एकमेव संस्था म्हणजे सैन्यदल. परमवीरचक्र विजेते कॅप्टन बाना सिंह यांनी एका कार्यक्रमादरम्यान सियाचीनमधील सर्वोच्च उंचीवर देशसेवा बजावणाऱ्या सैनिकांसाठीची ऑक्सिजनची गरज व्यक्त केली. सैनिकांना देशसेवा करताना प्राणवायूची गरज भासत असल्याचे ऐकून अस्वस्थ झालेल्या सुमेधाताई यांनी भारतीय हवाईदलातून निवृत्त झालेले पती योगेश चिथडे यांच्या मदतीने सैनिकांसाठी प्राणवायू कसा पुरवता येईल, याचा ध्यास घेतला आणि स्वतःचे दागिने विकून ऑक्सिजन जनरेशन प्लान्टची उभारणी केली आहे. त्यासाठी ''सिर्फ फाउंडेशन''च्या माध्यमातून सैनिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवणाऱ्या सुमेधाताईंचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत. सर्व देशप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन उर्मी ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com