सिंधुदुर्गनगरी येथे रविवारी व्याख्यान
सिंधुदुर्गनगरी येथे
रविवारी व्याख्यान
कुडाळः सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई (रजिस्टर) शाखा कुडाळतर्फे भारताच्या संविधानाच्या ७५ व्या स्वीकृत दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १५ डिसेंबरला सकाळी १०.३० वाजता सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक पत्रकार भवन येथे कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्रमांचे उद्घाटन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परुळेकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी पुणे येथील राही श्रुती गणेश यांचे व्याख्यान होणार आहे. जिल्ह्यातील बौद्ध हितवर्धक समाजाच्या बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कुडाळ शाखेचे अध्यक्ष अनिल परुळेकर, सचिव सत्यवान कदम यांनी केले आहे.
---------------
ओटवणेत शनिवारी
दत्त जयंती उत्सव
ओटवणेः येथील प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज समाधी मंदिरात अखंड गुरुचरित्र पारायण सप्ताहास विधिवत प्रारंभ झाला. याची सांगता १४ डिसेंबरला दत्त जयंतीला होणार आहे. यानिमित्त समाधी मंदिरात सकाळी परमपूज्य कुडाळकर महाराज समाधी व उत्सव मूर्तीचे पूजन आणि दत्त मूर्ती आणि सर्व देवतांची व पूजा अभिषेक करण्यात आला. गुरुचरित्र पोथ्यांचे पूजन रवींद्र कुडाळकर यांच्या हस्ते सपत्नीक पूजन झाले. पुरोहित किरण मुंडले यांनी मंत्रोच्चारात पूजन केल्यानंतर महाभिषेक झाला. अॅड. सुरेंद्र मळगावकर, महादेव रेडकर, अंकुश नाईक, प्रकाश केळुसकर, सुनील मेस्त्री, गजानन रासम, सुरेश वरेकर, जया वरेकर, अनिकेत कुडाळकर, विनंती कुडाळकर आदी उपस्थित होते. कुडाळकर महाराजांच्या पुण्यातील मठातही अखंड गुरुचरित्र पारायण सप्ताहास प्रारंभ झाला. लाभ घेण्याचे आवाहन समाधी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त डॉ. अनिकेत कुडाळकर यांनी केले आहे.
--------------
माजी विद्यार्थ्यांचा
मेमध्ये महामेळावा
मसुरेः चौके भ. ता. चव्हाण विद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्याचे निश्चित केले आहे. त्याच्या नियोजनासाठी चौके पंचक्रोशीतील सर्व माजी विद्यार्थ्यांची सभा चौके हायस्कूल येथे कृ. बा. करलकर यांच्या अध्यक्षेतेखाली झाली. हा महामेळावा ३ मे रोजी घेण्याचे ठरले. कोअर कमिटीची निवड करण्यात आली. कमिटीच्या अध्यक्षपदी कृ. बा. करलकर, उपाध्यक्षपदी बिजेंद्र गावडे व सुरेश चौकेकर यांची निवड करण्यात आली. सचिव म्हणून विनायक गावडे, सहसचिव विनोद चव्हाण, खजिनदार विजय चौकेकर, सदस्य संतोष गावडे, रवींद्र साळकर, उदय सुकाळी, अनिल सुकाळी, अश्विनी सुकाळी, श्यामसुंदर मेस्त्री, अनिल आचरेकर, अंकुश पोपळे, सुवर्णलता मोर्ये यांची निवड करण्यात आली. माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन करलकर यांनी केले आहे.
---------------
सावंतवाडी-भटवाडीत
शनिवारी दत्त जयंती
सावंतवाडीः परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी महाराज यांच्या आज्ञेने प्रस्थापित सावंतवाडी भटवाडी येथील दत्त मंदिरात शनिवारी (ता. १४) दत्त जयंती उत्सव आयोजित केला आहे. या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी ९ वाजता लघुरुद्र, अभिषेक, दत्तपूजा, सायंकाळी ५ वाजता अवधूत बुवा धूपकर (पिंगुळी-कुडाळ) यांचे कीर्तन, त्यानंतर दत्तजन्म, रात्री ८ वाजता नामस्मरण, नऊ वाजता भजन होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन विठ्ठल मंदिर व दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट भटवाडी-सावंतवाडी यांनी केले आहे.
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

