हडपीड येथे शनिवारी दत्त जयंती उत्सव
wt114.jpg
30902
स्वामी समर्थ मठ
हडपीड येथे शनिवारी
दत्त जयंती उत्सव
सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. ११ः हडपीड येथील स्वामी समर्थ मठामध्ये शनिवारी (ता. १४) दत्त जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी-मुंबई यांनी केले आहे.
शनिवारी (ता. १४) सकाळी ७ ते ९ श्री गणेश पूजन, स्वामींच्या पादुका पूजन, पुण्याहवाचन, होमहवन, ९ ते ११ पर्यंत लघुरुद्र, कुंकुमार्चन, ११ ते १२ पालखी सोहळा, दुपारी १२ ते १.३० आरती, १ ते ३ महाप्रसाद, ३ ते ४ अक्कलकोट यात्रा दर्श़न, सायंकाळी ४ ते ५ या वेळेत नामस्मरण, ५.३० वाजता महापुरुष वारकरी प्रासादिक भजन मंडळ कासार्डे-देऊळवाडी यांचे दिंडी भजन, शुक्रवारी (ता. १३) सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत देवगड फाउंडेशन डॉ. आठवले कँम्पसद्वारा रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले आहे.
या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी-मुंबई अध्यक्ष प्रभाकर राणे, सचिव नंदकुमार पेडणेकर, खजिनदार ज्ञानेश्वर राऊत व स्वामी समर्थ मठ हडपीड कार्यकारी मंडळ मुंबई व गाव समिती मंडळ हडपीड यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

