ओटववाडीत हरिनाम सप्ताह उत्साहात
swt115.jpg
30903
ओटववाडीः हरिनाम सप्ताहानिमित्त भाविकांची झालेली गर्दी.
ओटववाडीत हरिनाम
सप्ताह उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. ११ ः ओटववाडी येथे सात प्रहरांचा हरिनाम सप्ताह उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाला. पारंपरिक वारकरी भजनांनी परिसर टाळ-मृदंगाच्या गजराने दणाणून गेला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गावातील ग्रामस्थ व माहेरवाशिणींनी ओटी भरून सेवा केली. मुंबईकर चाकरमानीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. यानिमित्त मंगळवारी (ता. १०) श्रींची महापूजा आयोजित करण्यात आली. यानिमित्त रात्री गुरुवर्य विजय परब यांचे शिष्य बुवा संदीप लोके विरुद्ध गुरुवर्य श्रीधर मुणगेकर यांचे शिष्य बुवा संतोष जोईल यांच्यात टी-ट्वेंटी डबलबारी भजनांचा सामना रंगला. यासाठी भजन रसिकांची मोठी गर्दी झाली होती. बुवा जोईल यांनी आकर्षक नोटेशनाने भजनाची सुरुवात केली. लोके यांनी तिन्ही सप्तकांत आवाज लावत रसिकांची मने जिंकली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

