कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे रविवारी वार्षिक पुरस्कार वितरण

कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे रविवारी वार्षिक पुरस्कार वितरण

Published on

rat११p७.jpg-
२४N३०८६८
उदय निरगुडकर

‘कऱ्हाडे ब्राह्मण’चे रविवारी पुरस्कार वितरण

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा येत्या रविवारी (ता. १५) दुपारी ३ वाजता शेरेनाका येथे संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात आयोजित केला आहे. या वेळी ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांचे सर्वोत्तमाचा ध्यास या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष माधव हिर्लेकर व उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये यांनी केले आहे.
या कार्यक्रमात विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आर्या डोर्लेकर, धन्वंतरी पुरस्कार डॉ. छाया जोशी (राजापूर), आदर्श पौरोहित्य पुरस्कार वे. मू. श्रीकृष्ण पाध्ये (लांजा), आदर्श कीर्तनकार पुरस्कार रोहन पुराणिक (वेंगुर्ला), आचार्य नारळकर पुरस्कार रूचा हर्डीकर (आडिवरे, राजापूर), कृषी संजीवन पुरस्कार प्रसाद पाध्ये (पाथर्डी, चिपळूण) यांना प्रदान करण्यात येणार आहे. उद्योगिनी पुरस्कार सई ठाकुरदेसाई (गोळप, रत्नागिरी) आणि उद्योजक पुरस्कार वरद खांडेकर (बुरंबाड, संगमेश्वर) यांना देऊन गौरवण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी पितांबरी उद्योगसमुहाचे सहकार्य लाभले आहे. जास्तीत जास्त कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे सभासद, ज्ञातीबांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com