राज्य प्रदर्शनात मांडणार सह्याद्रीच्या कलाकृती
-rat११p२१.jpg, rat११p२२.jpg, rat११p२५.jpg, rat११p२६.jpg-
२४N३०८८८, P२४N३०८८९, २४N३०८९३, २४N३०८९२
चिपळूण ः कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी काढलेल्या अप्रतिम कलाकृतींची नागपूरमधील प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
----------
राज्य प्रदर्शनात सह्याद्रीच्या कलाकृती
नागपूरमध्ये प्रदर्शन ; ३० कलाकृतींचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ११ ः कला संचालनालयाच्यावतीने महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. या प्रदर्शनासाठी व्यावसायिक व विद्यार्थी असे दोन विभाग असतात. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक चित्रकार व कला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांची कलाकृतीची निवड होणे ही अभिमानाची बाब समजली जाते. सावर्डेतील सह्याद्री कला महाविद्यालयाने यावर्षीही यशाची परंपरा कायम ठेवत या प्रदर्शनात आपल्या कलाकृतींची मोहोर उठवली आहे.
यावर्षी घेण्यात आलेल्या ६४व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनासाठी कोकणातील अग्रगण्य सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालयातील विद्यार्थी विभागातून २५ विद्यार्थ्यांच्या ३० कलाकृतींची निवड झाली आहे. या वर्षीचे ६४वे महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शन नागपूर येथे होणार आहे. यामुळे एवढ्या कलाकृती प्रदर्शनात दिसणे, ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मिथिल अंगचेकर, विराज पाचाडकर, ज्योती पांचाळ, साहिल परूळेकर, आदित्य सावरटकर, अभिषेक जावळे, तन्वी गोरिवले, धनंजय नलावडे, ऋतिक इनामदार, सोनल घाणेकर, प्रतीक गांजेकर, स्वरूप पवार, तुळशी भुवड, सुजल निवाते, शुभम घोरपडे, प्रथमेश गोंधळी, सार्थक आदवडे, भूषण थवी, चैतन्य मांडवकर, रूचित सांगळे, विशाल गोवळकर, ऋषिकेश पड्याळ, सोहम धामणस्कर, अध्वज चव्हाण, विशाल मसणे यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

