नदी, खाडीतील समस्या मानवनिर्मित
-rat११p१५.jpg-
P२४N३०८७६
रत्नागिरी : भाट्ये येथील खाडी व समुद्राचा संगम.
----------
मालिका- नदी, खाडी संवर्धन- भाग १
महाराष्ट्राला किनारी परिसंस्थेच्या जैवविविधतेचे वरदान मिळालेले आहे. याच परिसंस्थेमधील एक परिसंस्था म्हणजे खाडी प्रदेश होय. त्याचबरोबर सह्याद्रीच्या खोऱ्यातील अनेक छोट्या मोठ्या नद्या समुद्राला जाऊन मिळतात. त्या ठिकाणी खाडीचा भूप्रदेश तयार झालेला आहे. कोकणातील प्रत्येक खाडीची स्वतंत्र अशी जैवविविधता पाहायला मिळते; मात्र गेल्या काही वर्षांमध्ये खाडी ही परिसंस्था वातावरणातील बदल, मानवनिर्मित कारणांमुळे निर्माण झालेली संकटे आणि सतत येणारे पूर अशा विविध कारणांमुळे समस्येच्या गर्तेत सापडलेली आहे. या समस्या, त्यावरील उपाययोजना आणि भविष्यातील आव्हाने याचा उहापोह करणारी मालिका आजपासून...
- मकरंद पटवर्धन, रत्नागिरी
---
कोकणामधील नदी, खाडीतील समस्या मानवनिर्मितच अधिक
डॉ. सुमंत पांडे ः कंपन्यांतील प्रदूषित पाणी बंद करण्याचे आव्हान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : कोकणातील नदी आणि खाडीतील बहुतांश समस्या या मानवनिर्मित आहेत. सांडपाणी आणि घनकचरा या समस्या माणसाच्या वर्तनाशी निगडित आहेत. त्यामुळे वर्तनात बदल हा शाश्वत ठरतो. नेमका अभ्यास आणि संभाव्य संवर्धनाचे उपाय निश्चित करून नदी, खाडीतील समस्या दूर करता येऊ शकतात, असा विश्वास अभ्यासक डॉ. सुमंत पांडे यांनी व्यक्त केला.
प्रदूषित नद्या, खाड्यांमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. अचानक पूर येणे, मासे, जलचरांचा मृत्यू व खाडीमध्ये प्रजननात अडथळे, क्षारपड जमिनी वाढल्याने जमिनी नापीक होणे अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. याबाबत या विषयातील अभ्यासक डॉ. पांडे म्हणाले की, पाऊसमान आणि भूरचनेनुसार कोकणचे ढोबळमानाने तीन विभाग पडतात. उत्तर कोकणात पालघर आणि ठाणे जिल्हा, मध्य कोकणात रायगड आणि दक्षिण कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो. नद्या गाळाने भरल्या आहेत. वाहत्या पाण्यात प्लास्टिकच्या पिशवीतून निर्माल्य टाकले जाते. प्लास्टिकचा भस्मासूर आपल्याला सर्वत्रच पाहायला मिळतोय.
डॉ. म्हणाले की, महाराष्ट्रात ४ हजार जलदूत तयार केले आहेत. प्रत्येक १० किलोमीटरला एक जलदूत मिळाला पाहिजे. त्याने जनजागृती करावी, त्याला प्रशिक्षण देऊ. रासायनिक कंपन्यांतून प्रदूषित पाणी खाड्या, नद्यांमध्ये सोडले जाते. कंपन्यांनी प्रदूषित पाण्यावर ट्रीटमेंट करून मग ते पाणी सोडले पाहिजे. याकडे दुर्लक्ष होत आहे. कुंडलिका नदी प्रदूषित नद्यांच्या यादीत आहे. पुढील १० वर्षांत आणखी नदी, खाड्या प्रदूषित होऊ नये याकरिता प्रत्येकानेच जबाबदारीने वागले पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. अलिकडेच नदीकी पाठशाला आयोजित केली होती. अशा प्रकारे कार्यक्रम सर्वत्र व्हायला हवेत.
(क्रमशः)
-----
नदी पाणलोट क्षेत्र
शास्त्री- ९
वाशिष्ठी- ६
कोदवली- १
मुचकुंदी- १
काजळी- १
वाघोटण- १
------
चौकट २
कोकणातील खाड्या
डहाणू, दातिवरे (वैतरणा/तानसा), वसई (उल्हास), ठाणे (भातसई), मनोरी, मालाड, माहीम, पनवेल, धरमतर (अंबा/ पाताळगंगा), रोहा (कुंडलिका), राजापुरी (काल), बाणकोट (सावित्री), केळशी, दाभोळ (वाशिष्ठी), जयगड (शास्त्री), भाट्ये (काजळी), पूर्णगड (मुचकुंदी).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

