देवगड नगरपंचायत विषय समिती सभापतींच्या निवडी

देवगड नगरपंचायत विषय समिती सभापतींच्या निवडी

Published on

swt1111.jpg
30955
शरद ठुकरूल, प्रणाली माने, आद्या गुमास्ते, मिताली सावंत

देवगड नगरपंचायत विषय
समिती सभापतींच्या निवडी
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ११ ः येथील देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या विषय समिती सभापतींची निवड आज प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या उपस्थितीत झाली. समिती सभापतीपदी भाजपच्या निवडी झाल्या.
यावेळी नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, मुख्याधिकारी सूरज कांबळे यांच्यासह अन्य नगरसेवक तसेच नगरपंचायत कर्मचारी नीलेश बांदिवडेकर, रोहित पाटील, राजदीप कदम उपस्थित होते. नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी पदसिध्द उपनगराध्यक्षा मिताली सावंत यांची आणि उपसभापतीपदी ॠचाली पाटकर यांची निवड झाली. तर सदस्य म्हणून मनिषा घाडी आहेत. सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी शरद ठुकरूल यांची निवड झाली असून या समितीमध्ये निवृत्ती उर्फ बुवा तारी, तन्वी चांदोस्कर सदस्य आहेत. स्वच्छता वैधक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी आद्या गुमास्ते यांची निवड झाली. या समितीमध्ये विशाल मांजरेकर, मनिषा जामसंडेकर सदस्य आहेत. तर पाणी पुरवठा व जलनिःसारण समिती सभापतीपदी प्रणाली माने यांची निवड झाली. या समितीमध्ये सदस्य म्हणून संतोष तारी, स्वरा कावले यांचा समावेश आहे. दरम्यान, नुतन सभापतींचे भाजपचे बाळ खडपे, तालुकाध्यक्ष राजेंद्र शेटये, संतोष किंजवडेकर, गणपत गावकर, मिलिंद माने, योगेश पाटकर, दयानंद पाटील, वैभव करंगुटकर, योगेश चांदोस्कर, उषःकला केळुसकर आदींनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी भाजपचे अन्य कार्यकर्ते तसेच नगरसेवक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com