म्हाडाच्या अर्जासाठी २४ पर्यंत मुदतवाढ
म्हाडाच्या अर्जासाठी
२४ पर्यंत मुदतवाढ
कणकवली, ता. ११ ः म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे दोन हजारांपेक्षा अधिक सदनिकांच्या विक्रीकरिता सोडत सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता २४ डिसेंबरच्या रात्री बारा वाजेपर्यंत अर्जदारांना आपले अर्ज सादर करण्यात करता येणार आहेत. या सोडतीत २० टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत ५९४ सदनिका, पंधरा टक्के एकात्मिक गृहनिर्माण योजनेंतर्गत ८२५ सदनिका, कोकण मंडळाच्या गृहनिर्माण योजनेंतर्गत विखुरलेल्या ७२८ सदनिका, रोहा रायगड व ओरस सिंधुदुर्ग येथे ११७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कोकण मंडळ सोडतीसाठी अर्ज भरणा प्रक्रियेला ११ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरुवात झाली होती.
मंडळांनी जाहीर केलेल्या सदनिका विक्री सोडतील अर्जदार २४ डिसेंबरपर्यंत आपले अर्ज सादर करू शकतात. त्यानंतर २६ डिसेंबरला अर्जदार अनामत रक्कम ऑनलाईन भरू शकतात. सोडतीसाठी पात्र अर्जांची प्रारूप यादी आठ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर १० जानेवारीला सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादीवर आपले दावे व हरकती नोंदविता येतील. तसेच १६ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता सोडतीत सहभाग घेणाऱ्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

