सिंधुदुर्गात १६ पासून कुष्ठरुग्ण शोधमोहीम

सिंधुदुर्गात १६ पासून कुष्ठरुग्ण शोधमोहीम
Published on

swt११०.jpg

डॉ. सई धुरी

सिंधुदुर्गात १६ पासून कुष्ठरुग्ण शोधमोहीम
डॉ. सई धुरीः उपेक्षित गटांवर विशेष लक्ष
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ११ः राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत उपेक्षित गटांवर विशेष लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याने वीटभट्ट्या, स्थलांतरित लोक, बांधकाम मजुर, निवासी आश्रमशाळा, भिक्षागृह, खाणकामगार, कारागृहातील कैदी, औ‌द्योगिक कामगार, उसतोड कामगार या घटकांकरिता कु.सु.म. (कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट) अंतर्गत विशेष सर्वेक्षण १६ ते २० डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत २०२७ पर्यंत शुन्य कुष्ठरोग प्रसार हे ध्येय निश्चित केले आहे. यामध्ये प्रथम जिल्हा नंतर तालुका व शेवटी गाव असे टप्याटप्याने कुष्ठरोग दुरीकरण करावयाचे आहे. हे ध्येय विहित मुदतीत साध्य करावयाचे असल्याने नियमीत संशयीत कुष्ठरुग्ण शोधणे गरजेचे आहे. तसेच नविन कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून उपचाराखाली आणण्यासाठी केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व जिल्ह्यामध्ये १६ ते २० डिसेंबर या कालावधीत विशेष सर्वेक्षण कुसुम (कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र) ही मोहिम आयोजित करण्यात आलेले आहे. या मोहिमेमध्ये ज्या व्यक्तींची तपासणी नियमित सर्वेक्षणांमध्ये अथवा कुष्ठरोग शोध मोहिमेदरम्यान होण्याची १०० टक्के खात्री नाही, अशा उपेक्षित गटांवर विशेष लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. वीटभट्ट्या, स्थलांतरित लोक, बांधकाम मजुर, निवासी आश्रमशाळा, भिक्षागृह, खाणकामगार, कारागृहातील कैदी, औ‌द्योगिक कामगार, उसतोड कामगार इत्यादी बहुतेक वेळा हा उपेक्षित गट सकाळी लवकर कामावर जातात आणि सायंकाळी उशिरा घरी परततात. यामुळे या गटातील व्यक्तींची नियमित आरोग्य तपासणी होत नाही. तसेच कुष्ठरोग शोध मोहिमेमध्ये शारिरीक तपासणीपासून वंचित राहतात, अशा घटकांकरिता हे विशेष सर्वेक्षण आयोजित करण्यात आलेले आहे.
-------------
चौकट
१२३ पथकांची स्थापना
हे सर्वेक्षण आशा व प्रशिक्षित पुरुष स्वयंसेवक यांच्याद्वारे करण्यात येणार आहे. या शोधमोहिमे अंर्तगत सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये अति जोखमीच्या २६३ वस्तीतील, भागातील ८४५३ लोकसंख्येची कुष्ठरोग विषयी तपासणी करण्यात येणार आहे. या शोधमोहिमेसाठी एक आशा कार्यकर्ती, एक स्त्री स्वयंसेविका व एक पुरुष स्वयंसेवक अशा दोन लोकांच्या १२३ पथकांची स्थापन करण्यात आली आहे.
---------------
चौकट
आठ महिन्यात २९ नवीन रुग्ण
सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये एकूण आठ तालुके असून एप्रिल २०२४ ते नोव्हेंबर २०२४ पर्यंत २९ नवीन कुष्ठरुग्ण आढळलेले आहेत. त्यामध्ये पुरुष २१, स्त्रीया ७ आहेत व लहान मुल एक यांचा समावेश आहे. सध्या उपचाराखाली एकूण ३० रुग्ण आहेत.
---------------
कोट
शोध मोहिमेसाठी येणाऱ्या पथकाला जनतेने सहकार्य करावे. तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली तालुका समन्वय समिती स्थापन कराव्यात. तालुका स्तरावर व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सर्वेक्षण करणाऱ्या पथकाचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. शासकिय यंत्रणा व समाजातील सर्व घटकांनी विविध स्तरावर सक्रिय सहभाग घ्यावा.
- अनिल पाटील, जिल्हाधिकारी
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com