स्वामी स्वरूपानंद वक्तृत्व स्पर्धा

स्वामी स्वरूपानंद वक्तृत्व स्पर्धा

Published on

-rat११p८.jpg-
P२४N३०८६९
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ व रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी आयोजित स्वामी स्वरूपानंद आंतरराज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांसमवेत मान्यवर.
------------

सावंतवाडी, कीर महाविद्यालय ठरले विजेते

स्वामी स्वरुपानंद आंतरराज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा ; वैयक्तीकमध्ये अनुश्री, श्रेया प्रथम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त) स्वामी स्वरूपानंद आंतरराज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या कनिष्ठ गटात अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या अनुश्री झाजम हिने व वरिष्ठ गटात एस. बी. कीर विधी महाविद्यालयाच्या श्रेया कुलकर्णी हिने प्रथम क्रमांक पटकावला. राणी पार्वतीदेवी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी हे कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांघिक चषकाचे मानकरी ठरले तर वरिष्ठ महाविद्यालयाचा सांघिक चषक एस. बी. कीर विधी महाविद्यालयाने पटकावला.
स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ (पावस) पुरस्कृत ही स्पर्धा गोगटे महाविद्यालय आणि अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महविद्यालयात ही स्पर्धा झाली. वरिष्ठ महाविद्यालयीन स्पर्धेचे हे २२वे तर कनिष्ठ महाविद्यालयीन स्पर्धेचे हे १६वे वर्ष होते. राज्यातील तरुण पिढीची सांगड अध्यात्म, नैतिकता आणि समाजविकास यांसोबत घालावी, या उद्देशाने ही स्पर्धा स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे आयोजित करण्यात येते. स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला स्वामी अद्वयानंद प्रमुख उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच विकसित भारत निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांची आध्यात्मिक प्रगती होणं ही काळाची गरज आहे. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालय हे काम उत्तमरितीने करेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या अध्यक्षा तथा रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष जयंत देसाई, कार्यवाह हृषिकेश पटवर्धन, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य सुनील गोसावी, पर्यवेक्षक विद्याधर केळकर आदी मान्यवर बक्षीस समारंभास उपस्थित होते.
--
स्पर्धेचा निकाल असा
कनिष्ठ गट- अनुश्री झाजम (अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय), आदिती राज्याध्यक्ष (राणी पार्वतीदेवी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी), उमा तावडे (माध्यमिक आश्रमशाळा कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, निवे), उत्तेजनार्थ प्राची सावंत (राणी पार्वतीदेवी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय), तृप्ती मदने (शिरगांव ज्युनिअर कॉलेज शिरगाव, चिपळूण). सर्वोत्कृष्ट संघ मार्गदर्शक हा पुरस्कार महाश्वेता कुबल (राणी पार्वतीदेवी हायस्कूल). वरिष्ठ गट-श्रेया कुलकर्णी, वंशिता भाटकर (एस. बी. कीर विधी महाविद्यालय), सानिया यादव (कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, लांजा). उत्तेजनार्थ रोजीना साबळे (कला आणि विज्ञान महावि‌द्यालय, सावर्डे), ओंकार आठवले (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय). सर्वोत्कृष्ट संघ मार्गदर्शक संयोगिता सासने (एस. बी. कीर विधी महाविद्यालय)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com