शामराव पेजे स्मृती न्यासतर्फे 
शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम

शामराव पेजे स्मृती न्यासतर्फे शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम

Published on

शामराव पेजे स्मृती न्यासतर्फे
शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम
रत्नागिरी ः लोकनेते शामराव पेजे स्मृती न्यास, रत्नागिरीतर्फे प्रतिवर्षी बारावी पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. यावर्षी शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम २२ डिसेंबरला कुणबी भवन येथे सकाळी ११ वा. होणार आहे. शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम न्यासाचे अध्यक्ष अॅड. सुजित झिमण यांच्या अध्यक्षतेखाली व कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष रामभाऊ गराटे ग्रामीण शाखा रत्नागिरी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. आतापर्यंत या न्यासातर्फे ३ हजार ४५८ विद्यार्थांना ५६ हजार ४७ हजार एवढी रक्कम शैक्षणिक शिष्यवृत्ती म्हणून प्रदान केली आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांत ८६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून, १ लाख ७२ हजार शिष्यवृत्ती म्हणून खर्च केली जाणार आहे. शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रमास समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन न्यासातर्फे करण्यात आले आहे.

जीजीपीएसच्या वार्षिक स्पर्धा
रत्नागिरी ः रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा शाळेच्या मैदानावर खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात झाल्या. कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. अरविंद नवेले (जिद्दी माउंटेनेरिंग) प्राथमिक विभागाचे शाळा समिती अध्यक्ष सुहास पटवर्धन, पालक प्रतिनिधी देसाई शाळेच्या मुख्याध्यापिका पाटणकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मुरकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गांगण यांनी केले. क्रीडास्पर्धाची सर्व व्यवस्था क्रीडा विभाग आणि इतर शिक्षक यांनी उत्तम प्रकारे नियोजनात झाली. या वेळी शाळेचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

चिंचखरी फाटकवाडी येथे दत्तजयंती
रत्नागिरी : शहराजवळील चिंचखरी फाटकवाडी येथे १३ ते १५ डिसेंबरदरम्यान दत्तजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १३ ला सकाळी १०.४५ वा. आरती, ११ वा. अखंड नामजपाची सुरुवात होणार आहे. १४ ला सकाळी ११ वा. नामजपाची सांगता होणार आहे. दुपारी १२.३० ला प्रसाद, सायं. ५ वाजता हभप कौस्तुभ फाटक यांचे दत्तजन्माचे कीर्तन त्यानंतर महाप्रसाद होईल. १५ ला सकाळी १०.३० वा. तुळशी व फुले सहस्रनाम पादुकांवर वाहण्यात येतील, महाप्रसाद होईल. सायंकाळी ६ वा. सत्यनारायण पूजा, ७.३० ते ९ भजनसेवा असे कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन फाटक कुटुंबीयांनी केले आहे.

आंबा झाडांचा १७ डिसेंबरला लिलाव
रत्नागिरी : भगवती बंदर येथील महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मालकीच्या १७ आंबा कलमांचा लिलाव होणार आहे. १७ डिसेंबरला दुपारी ३ वा. बंदर निरीक्षक, महाराष्ट्र सागरी मंडळ, बंदर कार्यालय, मांडवी जेट्टीजवळ हा लिलाव होईल. इच्छुकांनी लिलावाच्या अटी/शर्ती व झाडांचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती ही बंदर निरीक्षक, रत्नागिरी बंदर कार्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन प्राप्त करून घ्यावी, असे महाराष्ट्र सागरी मंडळ, रत्नागिरी बंदरे समुहाचे प्रादेशिक बंदर अधिकारी यांनी कळवले आहे.

भंगार खरेदीसाठी २१ डिसेंबरपर्यंत मुदत
रत्नागिरी : प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वर यांच्याकडील जुनी निर्लेखित साहित्य खरेदीसाठी इच्छुक खरेदीदांरानी आपले देकार बंद पाकिटातून २१ डिसेंबर सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सादर करावी, असे आवाहन संगमेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य र. वि. कोकरे यांनी केले आहे. हत्यारे (लोखंडी), तांबे (वायरच्या तुकड्यातील) तांबे, अॅल्युमिनियम (थोड्या प्रमाणात), लाकूड (थोड्या प्रमाणात) यांचे प्रतिकिलो दर सर्व बाबी उपलब्धतेनुसार (विक्रीसाठी) उपलब्ध आहे. या साहित्याची प्रतिकिलो दराप्रमाणे विक्री करावयाची असून, इच्छुक खरेदीदारांनी आपले देकार बंद पाकिटातून प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था संगमेश्वर यांच्या कार्यालयात २१ डिसेंबरला सायंकाळी ५.३० पर्यंत साहित्याची प्रत्यक्ष पाहणी करून आणून द्यावी. निविदा सादर करताना ती संगणकीय टंकलिखित असावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com