पोईप दत्त मंदिरात शनिवारी जन्मोत्सव
पोईप दत्त मंदिरात
शनिवारी जन्मोत्सव
मालवण, ता. ११ : तालुक्यातील पोईप खालची माधववाडी येथे (कै.) धोंडी बाबाजी माधव यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री दत्त मंदिरात खालची माधववाडी समस्त माधव, राणे, शिरोडकर यांच्या आयोजनाखाली शनिवारी (ता. १४) दत्त जयंती उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त दत्त मंदिरात सकाळी ११ वाजता श्रींची पूजा, दुपारी १२ वाजता आरती, दुपारी १ ते ३ वाजता महाप्रसाद, रात्री ८ वाजता दत्तजन्म सोहळा व आरती, रात्री ९ ते ११ पालखी सोहळा, रात्री १२ वाजता गुरुकृपा दशावतार नाट्य मंडळ, हळवल यांचा दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
............
मालवणात २१ ला
वक्तृत्व स्पर्धा
मालवण, ता. ११ : येथील रोटरी क्लबच्यावतीने आयोजित आणि रोटरीयन संजय गावडे पुरस्कृत ''रतन टाटा-प्रेरणादायी व्यक्तिमत्व'' या विषयावर वक्तृत्व स्पर्धा २१ डिसेंबरला सकाळी ९ वाजता कन्याशाळा मालवण येथे होणार आहे. ही स्पर्धा पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या दोन गटात घेण्यात येणार आहे. प्रत्येक गटात एका शाळेतून दोन विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. पहिल्या गटातील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ७००, ५००, ३०० रुपये व चषक, दुसऱ्या गटातील प्रथम तीन विजेत्यांना १०००, ७००, ५०० रुपये व चषक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे लिमये हॉस्पिटल मालवण येथे नोंदवावीत, असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष रमाकांत वाक्कर यांनी केले आहे.
.............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

