गुहागरमध्ये 18 ला जनआक्रोश मोर्चा
गुहागरमध्ये १८ ला
जनआक्रोश मोर्चा
गुहागर, ता. ११ ः मच्छीमार बोटीवरील तांडेल रवींद्र काशीराम नाटेकर यांच्यावर भ्याड हल्ला करून निघृण हत्या करणाऱ्या नराधमाला लवकरत लवकर मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी अखंड खारवी समाज रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांतील खारवी समाज समितीतर्फे १८ डिसेंबरला सकाळी १० वा. तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
२० ऑक्टोबर २०२४ ला साखरीआगर येथील मच्छीमार रवींद्र काशिराम नाटेकर यांच्यावर मासेमारी करताना जयप्रकाश विश्वकर्माने सुरीने तांडेल रवींद्र नाटेकर यांच्यावर हल्ला करून त्याचा खून केला होता, तसेच बोट पेटवून दिली होती. अतिशय घृणास्पद, मानवी जातीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध करून नराधमाला लवकरत लवकर मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी तसेच संबंधित घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा. या घटनेचा निःपक्षपातीपणे पोलिस तपास व्हावा, अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे. खारवी समाज समिती गुहागरचे अध्यक्ष महेश नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली हा मूकमोर्चा काढण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

