चिपळूण-सती-चिंचघरी विद्यालयात रंगला क्रीडा महोत्सव
-rat११p३५.jlg-
२४N३०९६३
चिपळूण ः सती चिंचघरी विद्यालयात आयोजित क्रीडा महोत्सवात रंगलेला कबड्डीचा सामना.
------------
सती-चिंचघरी विद्यालयात क्रीडा महोत्सव
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ ः तालुक्यातील सती चिंचघरी येथील सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या प्राथमिक विद्यालयात आयोजित केलेला क्रीडा महोत्सव रंगतदार झाला. पहिली ते चौथीमधील चिमुकल्या खेळाडूंनी कबड्डी, लंगडी, धावणे आणि खो-खो प्रकारात आधुनिक खेळाची चुणूक दाखवली. क्रीडा उत्सवात चिमुकल्यांनी चमकदार कामगिरी करतानाच खिलाडूवृत्ती जोपासली.
सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या प्राथमिक शाळा खेर्डी-चिंचघरी (सती) प्राथमिक विद्यालयात बुधवारी क्रीडा महोत्सव उत्साहात झाला. महोत्सवाच्या उद्घाटन समारंभासाठी चिपळूण पत्रकारसंघाचे अध्यक्ष नागेश पाटील, अविनाश शिंदे, साक्षी मोडक, संजना पेढांबकर, मुख्याध्यापक अरविंद सकपाळ, समिक्षा पिटले, ममता ठसाळे आदी उपस्थित होते.
सांघिक स्पर्धेत खो-खोमध्ये तिसरीतील मुले, चौथीतील मुली, कबड्डीत चौथीतील मुले-मुली. लंगडी प्रकारात दुसरी, चौथीतील मुले-मुली, रस्सीखेचमध्ये दुसरीची मुले-मुली तसेच धावणे प्रकारात लहान गट (मुले) प्रथम गणेश दाते, द्वितीय आयुष मोरे, तृतीय मयूर गुरव, धावणेमध्ये (मुली) प्राप्ती कदम, सौम्या खांबे, रिया कदम यांनी तर धावणे मोठा गटात (मुले) स्मित घाणेकर, अथर्व पवार, अरमान काणेकर. मुलींमध्ये आरोही चाळके, सई जंगम, प्रांजल भुवड यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले. स्पर्धेसाठी शिक्षिका मनीषा कांबळी, रश्मी राजेशिर्के, संदेश सावंत, अपूर्वा शिंदे, विनया नटे, वृषाली राणे, अर्चना देशमुख, रूपाली खरात, ज्योती चाळके, शीतल पाटील आदींनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

