क्राईम
भाट्ये उतारावर
दोन मोटारीचा अपघात
रत्नागिरी ः भाट्ये येथील कोहिनूर हॉटेल रस्त्यावर उतारात दोन मोटारीत अपघात झाला. संशयित मोटार चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंत बाळकृष्ण जाधव (रा. साटवली रोड, लांजा) असे संशयित मोटार चालकाचे नाव आहे. ही घटना गुरूवारी (ता. ५) सकाळी पावस ते रत्नागिरीकडे येणाऱ्या रस्त्यावर कोहिनूर हॉटेल उतारात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धी सुनील कोकरे या त्यांच्याकडील मोटार ही घेऊन गोळप त्या रत्नागिरी अशा येत होत्या. कोहिनूर हॉटेल उतारात आल्या असताना मागून येणारी मोटार वरील संशयित चालक अनंत जाधव यांनी मोटार निष्काळजीपणे चालवून पुढे जाणाऱ्या मोटारीला धडक दिली. यामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणी पोलिस हवालदार प्रवीण बेंदरकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
---
सार्वजनिक ठिकाणी
मद्य पिणाऱ्यावर गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील एमआयडीसी-फिनोलेक्स कॉलनीच्या मागील मोकळ्या मैदानात झाडीच्या आडोशाला बसून मद्य प्राशन करणाऱ्या संशयित तरुणाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अक्षय अजय भाटकर (वय २६) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १०) रात्री एमआयडीसी फिनोलेक्स कॉलनी येथे निदर्शनास आली. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल रूपेश भिसे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

