कोहिनूर पॉईंटच्या घळीत अडकलेल्या दोघांची सुटका

कोहिनूर पॉईंटच्या घळीत अडकलेल्या दोघांची सुटका

Published on

३०९६०
३०९६१

कोहिनूर पॉईंटच्या घळीत
अडकलेल्या दोघांची सुटका
पाण्यात खेळताना हरवले भान ः विद्यार्थ्यांसाठी मच्छीमार ठरले देवदूत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : समुद्राच्या पाण्याचा आनंद लुटण्याची हौस एका पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांच्या चांगलीच अंगलट आली. भाट्ये समुद्रात कोहिनूर पॉईंटच्या खालच्या बाजूला घळीच्या पुढे अमरावती येथील मुलगा आणि जळगाव येथील मुलगी गेली होती. पाण्यात खेळता खेळता भरतीची वेळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. समुद्र खवळला आणि अचानक मोठमोठ्या लाटा किनाऱ्यावर आदळू लागल्या. त्यांचा परत येण्याचा मार्गच बंद झाला. दगडाचा आधार घेऊन काही तास हे विद्यार्थी जीव मुठीत घेऊन लाटांना तोंड देत होते; परंतु मासेमारी करणारे तरुण देवदूत बनून तिथे आले. त्यानी दोघांना पाण्यातून बाहेर काढत जीव वाचवला.
शहराजवळील भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर अमरावतीहून आलेला मुलगा आणि जळगावची मुलगी काल सायंकाळी फिरायला आले होते. किनाऱ्यावर फिरण्याऐवजी ही दोघे कोहिनूर पॉइंटच्या खालच्या बाजूला गेले. तेथील मोठी घळ ओलांडून ते पुढे गेले. मोठमोठ्या दगडावर ते निवांत बसून पाण्याच्या लाटांशी खेळत होते. यामध्ये ते एवढे गुंतले होते की, सायंकाळी भरतीची वेळ झाल्याचे त्यांच्या लक्षातच आले नाही. काही क्षणात समुद्राचे पाणी अचानक वाढत गेले. हळूहळू मोठमोठ्या लाटा किनाऱ्यावर आदळू लागल्या. पाणी वाढत गेल्याने विद्यार्थ्यांची भीतीने गाळण उडाली. दगडाचा आधार घेता येत होता; परंतु तेथून बाहेर पडणे कठीण झाले. पाण्याचा लाटांचा मारा वाढतच चालला होता. बाहेर पडण्याच्या वाटेवर घळीमध्ये मोठ्या प्रमाणात समुद्राच्या लाटा आदळून परत जात होत्या. त्यातून मार्ग काढणे अवघड होते. जीवघेण्या प्रसंगात काही सुचत नव्हते. एवढ्यात तिथे क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांनी याची माहिती शहर पोलिसांना दिली. पोलिसदल, स्थानिक मच्छीमार धावून आले; परंतु अजस्त्र लाटांमध्ये मदतकार्यात अडथळा येत होता.


विद्यार्थ्यांनी अक्षरशः पाय धरले
येथे मासेमारी करणारे तरुण बुरहान मजगावकर आणि सुभान बुडये या तरुणांनी जीवाची बाजी लावत अजस्त्र लाटांचा मार सहन करत अडकलेल्या या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले. समुद्राच्या लाटांचा धाडसाने सामना करत दोघांना घेऊन ते बाहेर आले. जीव वाचल्यानंतर देवदूत बनून आलेल्या दोघा तरुणांचे विद्यार्थ्यांनी अक्षरशः पाय धरत आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com