वेंगुर्लेत लवकरच ''रोबोटिक्स लॅब''

वेंगुर्लेत लवकरच ''रोबोटिक्स लॅब''

Published on

31008

वेंगुर्लेत लवकरच ''रोबोटिक्स लॅब''
परितोष कंकाळः तालुकास्तर विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ११ः वेंगुर्ले नगरपरिषदेच्या हॉलमध्ये विद्यार्थ्यांसाठी लवकरच रोबोटिक्स व आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ताची अद्ययावत अशी लॅब होणार आहे. यापुढे तेथेही विज्ञान प्रदर्शनासाठी जागा उपलब्ध होणार असून, याचा शाळांनी लाभ घ्यावा, असे प्रतिपादन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले.
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती वेंगुर्ले शिक्षण विभागाच्यावतीने ५२ वे वेंगुर्ले तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन वेंगुर्ले हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन गटविकास अधिकारी पाटकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. व्यासपीठावर जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, वेंगुर्ले हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. डी. कांबळे तसेच, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक उपस्थित होते.
मुख्याधिकारी कंकाळ म्हणाले, "विज्ञान प्रदर्शनात भाग घेतलेले विद्यार्थी भविष्यातले शास्त्रज्ञ आहेत. विज्ञानाबाबत आपण पुस्तकांमधून वाचलेले असते; मात्र प्रदर्शनात ते प्रत्यक्षात करून दाखवावे लागते आणि विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी असते. आपली वसुंधरा टिकविण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजेत. जयंत नारळीकर, माशेलकर, काकोडकर या महान शास्त्रज्ञांचा आदर्श घेऊन येथील विद्यार्थी शास्त्रज्ञ घडावेत, ही अपेक्षा आहे."
सचिन वालावलकर यांनी, आजचे सरकार विज्ञानाची कास धरून काम करत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ध्येय ठेवून शिक्षण घ्यावे, असे आवाहन केले. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांनी, आभार मुख्याध्यापक पी. डी. कांबळे यांनी मानले.

चौकट
यश-अपयशापेक्षा सहभाग महत्त्वाचा
यश जरी एकाला मिळत असले तरी स्पर्धेमध्ये भाग घेणे महत्त्वाचे आहे. अपयशातून शिकून पुढच्या वेळेला यश संपादन करायचे असते. या विज्ञान युगात टिकायचे असेल तर शंभर टक्के तयारी करून उतरल्यास यश दूर नाही, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी पाटकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com