लांजा शाळा

लांजा शाळा

Published on

लांजा नं. ५ शाळा विभागात तिसरी

माझी शाळा, सुंदर शाळा अभियान ; जिल्हास्तरावर मांडकी खूर्द प्रथम

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ ः मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत झालेल्या मुल्यांकनात कोल्हापूर विभागात लांजा येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा नं. ५ ला तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच जिल्हास्तरावर मांडकी खुर्द शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला.
सुंदर शाळा हे अभियान ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबविण्यात आले होते. त्यानंतर केंद्र, तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरुन या अभियानांतर्गत सहभागी शाळांचे मुल्यांकन करण्यात आले. रत्नागिरी जिल्हास्तरावर दोन गटातील प्रत्येकी तीन क्रमांक काढण्यात आले. शासकीय गटात जिल्हा परीषद शाळा मांडकी खुर्दने (चिपळूण) प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक मळे शाळा (दापोली), तृतीय क्रमांक पूर शाळा (संगमेश्वर) यांना जाहीर झाला आहे. खासगी गटात कडवई महाराष्ट्र उर्दू हायस्कूलने (संगमेश्वर) प्रथम, टाळसूरे इंग्लिश स्कूल (दापोली) द्वितीय, रामेश्वर विद्यालय कोंडगे (लांजा) यांना तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे. या विजयोत्सवात सहभागी विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रीय प्रमुख, विस्तार अधिकारी यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार यांनी अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com