कोल्हापूर ः एसआयएलसी
लोगो
क्लाऊड किचन कार्यशाळा
स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी; कोल्हापूर येथे मार्गदर्शन
कोल्हापूर : क्लाऊड किचनमध्ये व्यावसायिक स्वयंपाकघराचा वापर केवळ डिलिव्हरी किंवा टेकआऊटसाठी अन्न तयार करण्याच्या उद्देशाने केला जातो. पारंपरिक रेस्टॉरंटपेक्षा अत्यंत कमी खर्चात क्लाऊड किचनद्वारे नफा कमावता येतो. मेस, कॅन्टीन किंवा अशा इतर सेवांचा स्वतःचा व्यवसाय क्लाऊड किचनच्या मदतीने कमीत कमी गुंतवणुकीत कसा सुरू करावा, याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा १५ डिसेंबरला आयोजिली आहे. यामध्ये स्वतःचा क्लाऊड किचन ब्रँड कसा सुरू करायचा, घरातूनच मेस अथवा कॅन्टीनचे व्यवस्थापन कसे करायचे, रेस्टॉरंट, कॅफे इत्यादींद्वारे क्लाऊड किचन कसे चालवावे, स्वच्छता आणि सुरक्षा प्रशिक्षण, सरकारी नियम, कायदे, अनुपालन, लायसन, एकापेक्षा अधिक क्लाऊड किचन कसे चालवावेत, आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे. ज्यांना हॉटेल अथवा मेस व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु पुरेशी गुंतवणूक नाही अशांसाठी क्लाऊड किचन हा उत्तम पर्याय आहे.
प्रशिक्षण सशुल्क असून अधिक माहितीसाठी संपर्क : ८४८४८११५४४.
क्यूआर कोड :
ठिकाण : सकाळ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

