पावशीतील एकाला लोखंडी रॉडने मारहाण
पावशीतील एकाला लोखंडी रॉडने मारहाण
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ ः आठशे रुपये दिले नाहीत म्हणून लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केल्याची घटना पावशी-मिटक्याचीवाडी नाका येथे घडली. याप्रकरणी गोविंद जयराम वराडकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार प्रसाद तवटे (रा. पावशी धरणवाडी) याच्याविरुद्ध येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पावशी-तवटे म्हाडेश्वरवाडी येथील गोविंद जयराम वराडकर हे आज कुडाळ येथे आठवडा बाजारासाठी आले होते. बाजार करून ते दुचाकीने त्यांचा मित्र महेंद्र तवटे याच्यासोबत पावशी येथे घरी परतत होते. यावेळी मिटक्याचीवाडी नाका येथे प्रसाद तवटे याने हात दाखवून त्यांची दुचाकी थांबविली आणि आठशे रुपये मागितले; मात्र वराडकर यांनी पैसे दिले नाहीत म्हणून प्रसादने त्यांना शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केली. यात वराडकर हे जखमी केले. महेंद्र तवटे यांनी त्यांना कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी कुडाळ पोलिसांत प्रसाद तवटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

