जनकल्याणची प्रगती कौतुकास्पद
30468
`जनकल्याण’ची प्रगती कौतुकास्पद
शेखरकुमार अहिरे : ओणीतील शाखेचे उदघाटन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता.१३ ः राजापूर तालुका जनकल्याण पतपेढीने सहकार क्षेत्रामध्ये योगदान देत केलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार राजापूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी काढले.
राजापूर तालुका जनकल्याण पतपेढीचे चेअरमन हरिश्चंद्र शिवगण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात राजापूर जनकल्याण पतपेढीच्या ओणी येथील पहिल्या शाखेचा प्रारंभ झाला. यावेळी जनकल्याण पतपेढीचे मुख्य प्रवर्तक सत्यवान कणेरी, रमेश पाजवे, राजापूर तालुका कुणबी पतपेढीचे चेअरमन प्रकाश मांडवकर, महिला पतपेढीच्या चेअरमन श्रुती ताम्हणकर, ओणी परिसर ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश पाध्ये आदी उपस्थित होते.
शेखरकुमार अहिरे यांनी सहकार कायद्याप्रमाणे प्रशासकीय कामकाज करताना क्वांटीटीपेक्षा क्वालिटीवर भर देण्याचा मौलिक सल्लाही साऱ्यांना दिला. यावेळी पतपेढीचे मुख्य प्रवर्तक कणेरी, पाजवे यांनी पतपेढीच्या स्थापनेचा उद्देश विषय करताना स्थापनेपासून आजपर्यंतचा प्रवास साऱ्यांसमोर मांडला.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

