अली हायस्कूलमध्ये क्रीडा स्पर्धा

अली हायस्कूलमध्ये क्रीडा स्पर्धा

Published on

अली स्कूलमध्ये
क्रीडा स्पर्धा
सावर्डे ः येथील अली पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धा कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सीड्स फाउंडेशनचे उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते शहाबुद्दीन गुलाम मोहिद्दीन सुर्वे व कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष मुजाहिद मेहर उपस्थित होते. या स्पर्धेची सुरवात विद्यार्थ्यांच्या कुराण पठणाने करण्यात आली. फातिमा चिकटे, खतिजा माखजनकर आईशा बोंबल यांनी नाथ सादर केली. कमिटी सदस्य अब्दुल कादीर भोबल, मुरादभाई खलपे, इस्लामुद्दिन बोंबल, नजीरभाई चिलवान आदींच्या हस्ते प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा स्वागत व सत्कार करण्यात आला. सुर्वे यांनी आपल्या मनोगतामध्ये मुलांना मोबाईलचे दुरूपयोग, वेळेचे महत्व व खेळाचे महत्व या विषयी सखोल मार्गदर्शन केले. चिकटे यांनी पाहुण्यांनी शाळेस कपाट भेट दिल्याचे जाहीर केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
---
वालावलकर रुग्णालयात
मोफत महाशस्त्रक्रिया

खेड : वालावलकर रुग्णालयातील मोफत महाशस्त्रक्रिया शिबिर जानेवारी महिन्यात आहे. या शिबिरात हर्निया, अॅपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, अल्सर, प्रोस्टेट ग्रंथी, मूळव्याध, मुतखडे, चरबीच्या गाठी, थायरॉईड, महिलांच्या गर्भाशय शस्त्रक्रिया, नाक-कान- घसा शस्त्रक्रिया, नाकाचे हाड वाढणे, कानाच्या पडद्याची शस्त्रक्रिया, टॉन्सिल्स, मणक्याची शत्रकिया, मोतिबिंदू शस्त्रक्रिया, इम्प्लांट रीमुव्हर अशा विविध शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या शिबिरात सहभागी होण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. याबाबत सचिन धुमाळ, संकेत जांभळे, संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---
‘वराडकर, बेलोसे, जैन’
येथे आपार दिवस साजरा
दापोली ः एन. के. वराडकर कला, आर. व्ही. बेलोसे वाणिज्य व शांतीलाल जैन कनिष्ठ महाविद्यालयात शासनाच्या आदेशानुसार आपार दिवस ९ आणि १० डिसेंबरला साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीला महाविद्यालयाचे पर्यवेक्षक एफ. के. मगदूम यांनी आपार आयडीच्या उपयोगाबद्दल सखोल माहिती दिली. त्यांनी शालेय व्यवस्थापनामध्ये आपार आयडीच्या महत्वाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि नोंदणी प्रक्रियेतील सोयींविषयी माहिती दिली. प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड यांनी विद्यार्थ्यांना आपार आयडीच्या उपलब्धतेचे महत्व स्पष्ट केले. ते म्हणाले, शिक्षणक्षेत्रात आपार आयडीचा प्रभावी वापर शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी महत्वपूर्ण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com