बांदा खेमराज प्रशालेत  
बाल क्रीडा महोत्सव सुरू

बांदा खेमराज प्रशालेत बाल क्रीडा महोत्सव सुरू

Published on

31194

बांदा खेमराज प्रशालेत
बाल क्रीडा महोत्सव सुरू
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १२ः सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आयोजित बांदा प्रभागस्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचे उद्घाटन झाले. बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्या अध्यक्षतेखाली खेमराज हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या या महोत्सवाचे उद्घाटन बांदा पोलिस निरीक्षक विकास बडवे यांच्या हस्ते झाले. या महोत्सवात बांदा प्रभागातील बांदा, इन्सुली, शेर्ले, तांबुळी, नेतर्डे या पाच केंद्रातील शाळा सहभागी झाल्या. उद्घाटन सोहळ्याला माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, विस्तार अधिकारी लक्ष्मीदास ठाकूर, बांदा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, उपाध्यक्षा संपदा सिध्दये, ग्रामपंचायत सदस्या रुपाली शिरसाट, सदस्य हेमंत मोर्ये, विलवडे सरपंच प्रकाश दळवी, निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत, केंद्र मुख्याध्यापक शांताराम असनकर, प्रभागातील सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी ठाकूर यांनी, सूत्रसंचालन गौरवी पेडणेकर यांनी केले. आभार नारायण नाईक यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com