शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेतीचा अंगीकार करावा

शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेतीचा अंगीकार करावा

Published on

rat१२p३७.jpg
P२४N३११८८
- राजापूर ः शेतकरी प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करताना डॉ. हणमंते. यावेळी उपस्थित मान्यवर.

प्रत्येक शेतकऱ्‍यांनी सेंद्रिय शेतीचा अंगीकार करावा

डॉ. हणमंते ः तळवडे येथे शेतकरी प्रशिक्षण शिबिर

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १३ः शेतकऱ्‍यांनी सेंद्रिय आणि सामूहिक शेतीचा अंगीकार करावा असे आवाहन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या लांजा येथील कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. हणमंते यांनी केले.
राजापूर तालुका कृषी कार्यालयातर्फे डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अभियानांतर्गत तळवडे येथे झालेल्या शेतकरी प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. या शिबिराला महाराष्ट्र राज्य सेंद्रीय प्रमाणिकरण समिती सदस्य डॉ. संदीप कांबळे, तालुका कृषी अधिकारी अनिल गावित, राजंगा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष गोपाळ गोंडाळ, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक वैभव अमरे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी डॉ. हणमंते यांनी शेतकरी आणि शेतकरी समूहगटांना सेंद्रिय शेतीचे महत्व, कंपनी स्तरावरील दहा ड्रम थेरी आणि सेंद्रिय शेती नियोजन आदींबाबत सविस्तरपणे मार्गदर्शन केले. डॉ. कांबळे यांनी जीवामृत, बीजामृत, निंबोळी अर्क, दशपर्नी अर्क, माती परीक्षण, माती नमुना घेण्याची पद्धत, बियोडायनामिक आदींविषयी मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी दशपर्णी आणि जीवामृत अर्क कसे तयार करायचे, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. राजंगा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष गोपाळ गोंडाळ यांनी शेतकरी कंपनीविषयक माहिती देताना सभासद हिस्सा, शासकीय समभाग, संभाव्य कंपनी उपक्रम आणि मार्केटिंग या विषयी मार्गदर्शन केले. तत्पूर्वी, या वेळी ग्रामपंचायत सदस्य गुरव, हातदेचे माजी सरपंच चव्हाण, राजंगा फार्मर प्रोड्युसर कंपनी उपाध्यक्ष हरेंद्र बाणे, कंपनी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश जानस्कर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. कार्यकमाचे सूत्रसंचालन व आभार आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक वैभव अमरे यांनी मानले.
---
शेतकऱ्यांना अभियानाची माहिती
या कार्यक्रमाची तालुका कृषी अधिकारी गावित यांनी प्रस्तावना करताना डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अभियानाची व्याप्ती, संकल्पना, गटस्तरावरील प्रशिक्षण, शेतकरी उत्पादक कंपनी, प्रमाणीकरण आणि योजनेविषयी सविस्तर माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com