डेरवण फाटा येथील रस्त्याच्या दुरुस्तीला आरंभ

डेरवण फाटा येथील रस्त्याच्या दुरुस्तीला आरंभ

Published on

rat१२p३६.jpg -
P२४N३११८३
सावर्डे ः कुडप फाट्याजवळ रस्ता दुरुस्तीचे काम करताना कामगार.

लोगो--------''सकाळ’ बातमीचा परिणाम

डेरवण फाट्यावरील रस्त्याची दुरुस्ती सुरू
सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग ; वाहनधारकातून समाधान
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १३ ः येथील डेरवण फाटा ते वालावलकर रुग्णालयादरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीला काल (ता.१२) सुरवात झाली. या रस्त्याच्या दुरवस्थेसंबधी ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील आणि बाजूपट्टीवरी खड्डे डांबराचे मिश्रण करून भरून घ्यायला सुरवात केलेली आहे. त्यामुळे प्रवासी व वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
सावर्डे येथील वालावलकर रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, शिवसृष्टी आदींमुळे हा रस्ता कमालीचा वर्दळीचा बनला आहे. रस्त्याच्या दुतर्फा नाले नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरूनच वाहात होते. त्यामुळे रस्त्यावर फाट्याच्या सुरवातीस खड्डे पडून बाजूपट्टी तुटली होती. कुडप फाटा, स्वप्नल निवासी संकूल क्र. ३, वालावलकर रुग्णालय समोर या ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडून रस्ता धोकादायक बनला आहे. पावसाच्या पाण्यामुळे वालावलकर रुग्णालयासमोर तर रस्ताच वाहून गेला आहे. पावसाळ्यात या रस्त्याला ओहोळाचे स्वरूप येते. याबाबत ‘सकाळ’मध्ये रस्त्याच्या दुरावस्थेसंबंधी वृत्त देऊन रस्तादुरुस्तीची व नाले बांधकामाची मागणी करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम खात्याने या वृत्ताची दखल घेऊन रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले. यामुळे वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com