जलरंगातील व्यक्तीचित्र अवघ्या ४५ मिनिटात साकारले
व्यक्तीचित्रे पाहून विद्यार्थी भारावले
प्रा. पोटफोडे यांचा कलाविष्कार ; पैसाफंड स्कूलमध्ये कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १३ ः व्यापारी पैसाफंड संस्था संगमेश्वर संचलित पैसाफंड इंग्लिश स्कूलच्या कला विभागात देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईनतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना व्यक्तीचित्राचे प्रात्यक्षिक प्रा. अवधूत पोटफोडे यांनी दाखवले. त्यांनी केवळ ४५ मिनिटात व्यक्तीचित्राचे जलरंगात प्रात्यक्षिक दाखवले. ते पाहून उपस्थित विद्यार्थी भारावून गेले. ते काढताना प्रमाण, रचना, छायाप्रकाश, शरीरशास्त्र यांचा अभ्यास महत्वाचा असतो, असेही त्यांनी सांगितले.
पैसाफंडच्या कला विभागातर्फे प्रा. सुयोग पेंढारकर, प्रा. अवधूत पोटफोडे यांचे स्वागत करण्यात आले. पेंढारकर यांनी दहावी आणि बारावीनंतर कलाक्षेत्रात कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत यावर मार्गदर्शन केले. कलेमध्ये आपल्या आवडीनुसार विषय निवडण्याची संधी उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करियर करणे सहजशक्य आणि सोपे झाले असल्याचे पेंढारकर यांनी सांगितले. डी-कॅडमध्ये कलाविषयक विविध उपक्रम राबवले जात असून ते पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी जरूर यावे, असे आवाहनही पेंढारकर यांनी केले. डी-कॅडचे प्राचार्य रणजीत मराठे यांनी संगमेश्वर तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांमध्ये जाऊन दहावी आणि बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कला शिक्षणाच्या असलेल्या संधींविषयी प्राध्यापकांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. कलाविषयक कार्यशाळेबद्दल प्राचार्य रणजीत मराठे, प्रा. अवधूत पोटफोडे, प्रा. सुयोग पेंढारकर यांना धन्यवाद दिले. प्रशालेचे मुख्याध्यापक सचिनदेव खामकर यांनीही या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

