विद्यालयातील कर्मचारी रंगले क्रीडा स्पर्धांमध्ये

विद्यालयातील कर्मचारी रंगले क्रीडा स्पर्धांमध्ये
Published on

- rat१३p७.jpg-
२४N३१३१०
सावर्डे : कॅरम खेळताना महिला कर्मचारी.

कर्मचारी रंमले क्रीडा स्पर्धेत
सावर्डे विद्यालयात उपक्रम ; शारीरिक तंदरुस्तीसह विरंगुळा
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता.१३ : येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डेत विद्यालयातील २२ पुरुष व १८ महिला कर्मचारी खेळाडूंनी विविध खेळात सहभाग घेतला.
सावर्डे विद्यालयात झालेल्या स्पर्धांमध्ये बॅडमिंटन क्रीडा प्रकारात पुरुष गटात राजू नाचणकर विजयी तर शिवलिंग सुपनेकर उपविजयी ठरले. बॅडमिंटन महिला गटामध्ये तेजस्विनी किंजळकर विजयी व दुर्वा पाष्टे उपविजयी झाल्या. कॅरम स्पर्धेत पुरुष गटात सुधीर कदम व संदीप पवार हे विजयी झाले आणि महिला गटात संचिता कदम व श्रद्धा सावर्डेकर यांचा गट विजयी झाला. संगीत खुर्ची महिला गटातून अनुजा बागवे, श्रावणी विचारे व दिशा विचारे यांनी यश मिळवले. दैनंदिन शालेय कामकाजातील मानसिक आणि शारीरिक थकवा दूर करून विरंगुळा व शालेय जीवनाला उजाळा त्याचबरोबर मनोरंजन आणि शारीरिक सुदृढता सुधारण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या बॅडमिंटन, संगीत खुर्ची व कॅरम स्पर्धेचे आयोजन केले होते. विद्यालयातील पुरुष व महिला गट या दोन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. यशस्वी कर्मचारी खेळाडूंचा सन्मान उपमुख्याध्यापक विजय चव्हाण व पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन राजेंद्र वारे व विजय चव्हाण यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com