बांगलादेशातील हिंदूंवरील आत्याचाराचा निषेध
बांगलादेशातील हिंदूंवरील आत्याचाराचा निषेध
हुसेन दलवाई ः राज्यात सामाजिक वातावरण बिघडतेय
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ : महाराष्ट्रात सामाजिक वातावरण बिघडत चालले असून, अल्पसंख्यांक समाजावर ठिकठिकाणी हल्ले होत आहेत. हे हल्ले त्वरित थांबवावेत, अशी मागणी काँग्रेसचे माजी खासदार, माजी कामगार मंत्री हुसेन दलवाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. बांगलादेशमधील हिंदू अल्पसंख्यांकांवरील अत्याचाराचा दलवाईंनी निषेध केला आहे.
दलवाई यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे. दापोलीमध्ये दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. राज्यात सरकार स्थापन होऊन दिवस उलटले असून, गृहमंत्री कोण याचा पत्ता नाही. ठिकठिकाणी अल्पसंख्यांक समाज आणि त्यांच्या संस्थांवर काही समाजकंटकांकडून हल्ले होत असून, ते त्वरित थांबवण्याची विनंती आहे. अमरावती जिल्ह्यात चांदुर बाजार येथील बेलोरा या खेडेगावात एका उर्दू शाळेवर काही समाजकंटकांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात शाळेतील आरसे फोडले, दगड मारले, लाकडांचे तुकडे फेकले आणि मुलांमध्ये आणि शिक्षकांमध्ये दहशत पसरवण्याचे काम केले आहे. समाजकंटकांनी शाळेच्या भिंतींवर अतिशय आक्षेपार्ह अशा घोषणा लिहिल्या आहेत. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे; परंतु अद्याप काहीच कारवाई झालेली नाही. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा दलवाई यांनी निषेध केला; परंतु तेथे अल्पसंख्यांक समाजावर अत्याचार होत आहे. त्यामुळे इथल्या अल्पसंख्यांक नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे चुकीचे आहे. हे सगळे घडत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखाते कोणाला द्यायचे, हे अद्याप ठरलेले नाही आणि महाराष्ट्रात अशाप्रकारे दहशतवादी व हिंसावादी वातावरण निर्माण केले जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्यामुळे हे ताबडतोब थांबवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत आणि ते करा ही माझी विनंती, असे दलवाई यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

