आयुर्वेद
आयुर्वेद हा समग्र स्वास्थ्य जपणारा
डॉ. मंजिरी जोग ः संस्कृत अध्ययन केंद्रात कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : आयुर्वेदामध्ये अत्यंत सूक्ष्म गोष्टींचादेखील खोलवर विचार केलेला दिसून येतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करताना शरीरावर होणारा परिणाम त्याचप्रमाणे ऋतुचर्येचा आणि दिनचर्येचा होणारा परिणाम त्यामुळे उद्भवणारे रोग आणि त्यावरचे उपाय या समग्र गोष्टींची चर्चा आयुर्वेदात दिसून येते. त्यामुळे आयुर्वेद हा निश्चितच समग्र स्वास्थ्य जपणारा आहे, असे प्रतिपादन डॉ. मंजिरी जोग यांनी केले.
महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापिठाच्या (रामटेक) भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन रत्नागिरी उपकेंद्रात समग्र स्वास्थ्य कार्यशाळेत त्या बोलत होत्या. या प्रसंगी वैद्य मंदार भिडे यांनी सांगितले की, काय खावं, काय प्यावं, कसं झोपावं, कसं बोलावं, कसं वागावं यासारख्या अनेक व्यावहारिक गोष्टींचा समन्वय आयुर्वेदाच्या सूत्रांमधून दिसून येतो आणि म्हणूनच स्वास्थ्याला एक आयाम देणारा ग्रंथ म्हणजे आयुर्वेद आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिकरित्या सुदृढता प्राप्त करण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी, लवचिकता वाढवण्यासाठी आणि मनःशांती मिळवण्यासाठी योग ही गुरूकिल्ली असल्याचे मत डॉ. जोग यांनी व्यक्त केले.
डॉ. शशांक पाटील यांनी सांगितले की, आपण आपल्या शरीराची जशी निगा राहतो राखतो त्याप्रमाणे दातांची निगा राखणं गरजेचं आहे. दातांचंही आरोग्य आपल्या शरीराच्या एकूण आरोग्याइतकंच महत्वाच आहे. दातांची स्वच्छता वेळोवेळी करणे, दात योग्यप्रकारे घासणे या बाबीदेखील शारीरिक स्वच्छतेत समाविष्ट आहेत. डॉ वीणा सहस्रबुद्धे यांनी सांगितले की, उपवास, आहार, होणारा रोग आणि त्याचे निदान या परस्पर संबंधित गोष्टी आहेत. निसर्गोपचार पद्धतीत मुख्यत्वे फळ आणि भाज्या यावरच जास्त भर दिला जातो कारण, शरीरामध्ये निसर्गतःच काही गोष्टी स्वतःहून बरी करण्याची शक्ती आहे, ज्याला चालना या निसर्गोपचार पद्धतीद्वारे दिली जाते.
-----
कोट
आज माणूस अनेक भावभावनांनी आणि अनेक विचारांच्या गुंतागुंतीने इतका ग्रासलेला आहे की, त्या व्यक्तीचे स्वतःकडेच दुर्लक्ष झाले आहे. या मानसिक चढ-उतारांचं आणि त्यामुळे होणाऱ्या विकारांचे आजच्या युगात समाज प्रबोधन होणे गरजेचे आहे.
- डॉ. शाश्वत शेरे, रत्नागिरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

