होमगार्ड वर्धापन दिन सिंधुदुर्गनगरीत उत्साहात

होमगार्ड वर्धापन दिन सिंधुदुर्गनगरीत उत्साहात

Published on

31366

होमगार्ड वर्धापन दिन
सिंधुदुर्गनगरीत उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १३ ः जिल्हयामध्ये ७८ व्या महाराष्ट्र होमगार्ड वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ७ ते १३ डिसेंबर या कालावधीत हा कार्यक्रम आयोजित केला होता.
होम गार्ड ऑफ इंडिया हे एक स्वयंसेवक दल आहे. ज्याला भारतीय पोलीस सेवेचे सहाय्यक म्हणून काम दिले जाते. होमगार्ड्स संघटनेची पुनर्रचना १९६६ मध्ये चीन-भारतीय युद्धानंतर पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनासह भारतात झाली, अशी माहिती यावेळी अपर पोलीस अधीक्षक तथा होमगार्ड कार्यालयाचे जिल्हा समासेशक कृषिकेश रावले यांनी यावेळी दिली. १३ ला सकाळी ८.३० वाजता जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्या हस्ते युनिट झेंडा चढविण्यात आला. यावेळी रावले बोलत होते. यावेळी जिल्हा समादेशक यांचे प्रशासिक अधिकारी एन. व्ही. परब, केंद्रनायक एस. एस. वाल्मिकी, कनिष्ठ लिपिक एस. एल. बटवाले , सैनिक व्हि. वाय. परब तसेच दिपक मेस्त्री, श्रीमती कविता पाताडे, संदेश गंगावणे, संतोष मातोंडकर, श्रीमती सरीता जाधव हे मानसेवी होमगार्ड अधिकारी उपस्थित होते. या होमगार्ड सप्ताहमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम, श्रमदान, परिसर स्वच्छता अभियान आदी उपक्रम राबविण्यात आले. मानसेवी होमगार्ड दलाच्या सर्व होमगार्ड व अधिकारी यांना त्यांचे कर्तव्य, जबाबदारीचे योगदान यांची जाणीव जिल्हयाचे प्रभारी केंद्र नायक एस. एस. वाल्मिकी यांनी दिली. ७८ व्या महाराष्ट्र होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त रावले यांनी जिल्ह्यातील सर्व होमगार्ड व होमगार्ड अधिकारी यांना शुभेच्छा दिल्या. वर्धापन दिनाचा कार्यक्रम रावले यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com