रत्नागिरी नदी, खाडी संवर्धन

रत्नागिरी नदी, खाडी संवर्धन

Published on

-rat१३p१.jpg-
२४N३१३०४
रत्नागिरी : झाकणे असलेल्या बंधाऱ्यांची कोकणात गरज आहे.
-rat१३p२.jpg-
२४N३१३०५
अविनाश निवाते.
----------
लोगो- नदी, खाडी संवर्धन- भाग ३

नदी प्रवाहातील बेटे काढा तर पात्र गाळमुक्त होईल

अविनाश निवाते ः पाणी अडवण्यासाठी झाकणाचे बंधारे बांधा

मकरंद पटवर्धन : सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : कोकणात जंगलतोड कमी करून वृक्ष लागवड व जोपासना करावी. जिथे पूर्वी होती तिथेच कोंड खोदावी. कोंडीमधील गाळ काढून ती मोकळी करावी. भूमी अंतर्भागात बंधारे व घडीचे बंधारे बनवणे शक्य आहे तसेच नदी प्रवाहातील बेटे काढून टाकली पाहिजेत. नदीत जिथे पाणी आहे तेथील गाळ काढावा. संपूर्ण नदी एकसारखी खोल, सरळ करू नये. कातळ फोडण्यासाठी सुरूंग किंवा ब्रेकरचा वापर करू नये. या उपाययोजनांवर काम करत आहोत, असे जलमित्र आणि नॅचरल सोल्युशन्सचे अविनाश निवाते यांनी सांगितले.
नदी, खाड्यांच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे, असे सांगून ते म्हणाले की, आम्ही पाणी, शेती, सांडपाणी यावर काम केले आहे. पाणीटंचाई निर्मूलन, जलव्यवस्थापन, नैसर्गिकरित्या सांडपाणी शुद्धीकरण, कचरा कंपोस्टिंग, नवीन तलाव बनवणे, जुन्या तलावांची दुरुस्ती केली आहे. सध्या बोअरवेलचा वापर वाढला आहे. पर्यावरण शिक्षणाचे काम आम्ही करत आहोत. भारतातील चार राज्यातील ३५० हून अधिक गावे पिण्याच्या पाण्यापासून टंचाईमुक्त केले. विविध पद्धतीचे १८० बंधारे कंपन्यांमार्फत बांधले. गावातलेच गवंडी, जाणकारांकडून हे बंधारे बांधले. रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी मुंबई, पुणे, दिल्ली, उपनगरातील १३००हून अधिक गृहनिर्माण संस्था, उद्योग, संस्थांना सल्ला दला आहे. नाम फाउंडेशनसोबत १५ नद्यांचे पुनरूज्जीवन, पूर व्यवस्थापन, ३० तलावांचे पुनरुज्जीवन केले आहे.
निवाते यांनी सांगितले, पाणीटंचाई मुक्तीसाठी काम केले पाहिजे. कोकणातले डोंगर उतारावरून पावसानंतर झरे सुरू असतात. हे पाणी कमी किंमतीत अडवू शकतो. त्यामुळे भौगोलिक परिस्थितीनुसार १ ते ४ महिने पाणी वाढवता येते. अनेकदा बंधारे बांधल्यानंतर गाळ साचतो. त्यामुळे पाण्याची क्षमता कमी होते. त्यावर पर्याय म्हणून झाकणाचे बंधारे बांधण्यास सुरवात केली. पावसाळ्यात झाकणे काढून ठेवायची आणि पाऊस कमी झाला की पुन्हा झाकणे लावायची, त्यामुळे पाणीसाठा वाढतो. झाकणामुळे खाडीतला मासा नदी, नदीतला ओढ्यात मासा वर जाऊ शकत नाही, वीण होऊ शकत नाही. त्यासाठी घडीचे बंधारे बांधले जात आहेत.
(समाप्त.)
-----
दृष्टिक्षेपात
-नद्यांची भूमिका ः जलस्रोत, निवासस्थान आणि जैवविविधता, पोषक द्रव्ये वाहतूक, जमिनीची धूप, हवामान नियमन, मनोरंजन आणि पर्यटन.
-नदीत गाळ येण्याची कारणे ः जंगलतोड, जमिनीचे सपाटीकरण, दरडी कोसळणे, बोगदे, रस्त्यांची कामे.
-----
४५ टक्के पाऊस एकट्या कोकणात

महाराष्ट्राचे क्षेत्रफळ ३ लाख ७ हजार ७१३ चौरस किमी असून, कोकणचे क्षेत्रफळ राज्याच्या १० टक्के म्हणजे ३० हजार ७२८ चौरस किमी आहे. राज्यात सरासरी ९३९ मिमी पाऊस पडतो. मध्य महाराष्ट्रात ९०१, मराठवाडा ८८२ आणि विदर्भात १०३४ मिमी पाऊस म्हणजे ५५ टक्के उर्वरित महाराष्ट्रात पडतो. कोकणात सरासरी ३ हजार मिमी पाऊस म्हणजे ४५ टक्के पाऊस एकट्या कोकणात पडतो, अशी आकडेवारी निवाते यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com