-पेट्रोलवाहू टॅंकरच्या टायरला अचानक आग

-पेट्रोलवाहू टॅंकरच्या टायरला अचानक आग

Published on

-rat१३p३.jpg-
P२४N३१३०६
रत्नागिरी ः मारूती मंदिर येथे टॅंकरच्या टायरला लागलेली आग विझवताना अग्निशमन दलाचे जवान.
-------

इंधनवाहू टॅंकरच्या टायरला आग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : शहरातील मारूती मंदिर येथे गुरूवारी (ता. १२) रात्री नऊच्या सुमारास मोठी दुर्घटना होता होता वाचली. पेट्रोल वाहतूक करणाऱ्या टॅंकरच्या चाकाला अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. टॅंकरचा मागचा टायर पेटतोय हे लक्षात आल्यानंतर मारूती मंदिर सर्कलला चालकाने टॅंकर थांबवला. प्रसंगावधान दाखवत अनेकांनी तत्काळ पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. टॅंकरचे ब्रेक लायनर प्रचंड गरम झाल्यामुळे ही आग लागून टायरने पेट घेतल्याचे सांगण्यात आले. पालिकेचा अग्निशमन बंब तत्काळ घटनास्थळी पोहचल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. फायरमननी तत्काळ ही आग आटोक्यात आणली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com