माखजनमधील गडनदी पात्रातील गाळ उपशाला सुरवात

माखजनमधील गडनदी पात्रातील गाळ उपशाला सुरवात
Published on

-rat१३p९.jpg -
२४N३१३४५
माखजन ः जेसीबीच्या साह्याने गडनदीतील गाळ उपसाच्या कामाला सुरवात झाली आहे.
---------------
गडनदी पात्रातील गाळ उपशाला सुरवात
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १३ ः संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथील गडनदी पात्रातील गाळ उपशाला सुरवात झाली आहे. यासाठी जिल्हा वार्षिक नियोजनमधून इंधनासाठी १३ लाख रुपये मंजूर झाले आहेत.
माखजन बाजारपेठेत वारंवार भरणाऱ्या पुराच्या पाण्याने व्यापारी व रहिवासी त्रस्त होते. गडनदी पात्रातील व बाजूच्या ओढ्यांमधील गाळ काढण्यात यावा, अशी मागणी अनेक वर्षे व्यापाऱ्यांकडून केली जात होती. या मागणीची दखल आमदार शेखर निकम यांनी घेत जिल्हा वार्षिक नियोजनमधून इंधनासाठी १३ लाख रुपये मंजूर करून आणले शिवाय गडनदीच्या बाजूला बाजाराकडे असलेल्या ओढ्याला संरक्षक भिंतीसाठी पत्तन योजनेतून १ कोटी रुपयेएवढा निधी मंजूर करून घेतला. सध्या माखजन बाजारपेठेनजीक गडनदी पात्रात गाळ काढण्याच्या कामाला गती आली आहे. या ठिकाणी जलसंपदा विभागातील मशिनरी कार्यरत आहे. गडनदीचा गाळ उपसत असल्याने बाजारपेठेत वारंवार भरणाऱ्या पाण्याचा फटका भविष्यात कमी बसण्याची शक्यता आहे. गाळ उपशाची कारवाई तत्काळ झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com