सिंधुदुर्गनगरीतील सामाजिक न्याय भवनाची दुरावस्था

सिंधुदुर्गनगरीतील सामाजिक न्याय भवनाची दुरावस्था

Published on

सिंधुदुर्गनगरीतील सामाजिक न्याय भवनाची दुरावस्था
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनः तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १३ः सिंधुदुर्गनगरी येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील सभागृहाची दुरावस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत हे सभागृह तत्काळ दुरुस्त करावे, अशी मागणी सिंधुदुर्ग भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
श्री. यादव यांनी दिलेल्या निवेदनात, महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बांधण्यात आली. जिल्ह्यात सिंधुदुर्गनगरी येथे हे भवन आहे. मात्र, या सभागृहातील विचार पिठाच्या भिंतीतून पडलेल्या भेगातून पावसाळ्यात पाणी झिरपत आहे. त्याबाबत वेळोवेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलेले आहे. परंतु, आजपर्यंत नन्नाचाचा पाढा वाचन चालूच आहे. ६ डिसेंबरला भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ५ डिसेंबरला अभिवादन सभेच्या वेळी उपस्थितांनी सभागृहाची अवस्था जी पाहिली त्याचा फोटो ईमेल सोबत पाठवलेला आहेच. आजपर्यंत त्या सभागृहात अनेक शासकीय, खाजगी संस्था संघटना यांनी विविध प्रशिक्षण येथे घेतली आहेत. २६ जानेवारी २०२५ या प्रजासत्ताक दिनापर्यंत या सभागृहाची उत्तम प्रकारे डागडुजी झाली नाही तर ओरोस फाटा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात घंटानात आत्मक्लेष उपोषण करणार आहे. या सभागृहाला नुसता कलर देऊन उपयोग नाही तर आधुनिकीकरणात प्लास्टर केले जाते त्याप्रमाणे त्याची डागडूची झाली पाहिजे अशी मागणी आहे, अन्यथा उपोषण अटळ आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com