फोटोसंक्षिप्त-आराध्या मांजरेकरची यशस्वी कामगिरी

फोटोसंक्षिप्त-आराध्या मांजरेकरची यशस्वी कामगिरी

Published on

swt1312.jpg
31402
आराध्या मांजरेकर

आराध्या मांजरेकरची
यशस्वी कामगिरी
कुडाळ, ता. १३ ः नुकत्याच झालेल्या झाराप केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत 100 मीटर धावणे क्रीडा प्रकारात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाराप कुंभारवाडीच्या आराध्या मांजरेकरने लहान गटात प्रथम तर लांबउडीड तृतीय क्रमांक पटकावला. त्याबद्धल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र पावसकर, उपाध्यक्ष चित्रा कुडाळकर, शिक्षणतज्ञ अजित मांजरेकर, सदस्य विजय हरमलकर, मुख्याध्यापक सुलभा देसाई, क्रीडा शिक्षक शैलेंद्र न्हावेलकर यांनी अभिनंदन केले.
-------------

मालवण कट्टा येथे
उद्या रक्तदान शिबिर
मालवण, ता. १३ ः सहकारमहर्षी (कै.) डी. बी. ढोलम यांच्या स्मृतिदिनानिमित्त आभाळमाया ग्रुप आणि जी. एच. फिटनेस कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.१५) सकाळी ९ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. कोरोना काळापासून कट्टा पंचक्रोशीत सामाजिक कार्यासाठी सुरू झालेल्या आभाळमाया ग्रुप कडून २०२१ पासून सहकारमहर्षी (कै.) डी. बी. ढोलम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रेकॉर्डब्रेक रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. हे रक्तदान शिबीर दरवर्षी नोव्हेंबरमध्ये घेण्यात येते. पण, राज्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे यावर्षी ते डिसेंबरमध्ये घेण्यात येत आहे. हे ११ वे रक्तदान शिबिर आहे. आभाळमाया ग्रुप, जी. एच. फिटनेस, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, इंग्लिश मीडियम स्कूल आणि सिनिअर कॉलेज यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर भरविण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराला उपस्थित राहून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन आभाळमाया ग्रुपचे संस्थापक राकेश डगरे यांनी केले आहे.
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com