''स्वामीकिरण''चे
बांद्यात प्रकाशन

''स्वामीकिरण''चे बांद्यात प्रकाशन

Published on

31408

‘स्वामीकिरण’चे
बांद्यात प्रकाशन
बांदा, ता. १३ ः स्वामीकिरण दिनदर्शिकेच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन आज येथील श्री देव बांदेश्वर-भूमिका मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. ही दिनदर्शिका शहरातील नागरिकांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष राजाराम ऊर्फ बाळू सावंत, दत्तप्रसाद कला-क्रीडा युवक मंडळाचे सचिव शैलेश लाड, स्वामीकिरण परिवाराचे सदस्य पत्रकार नीलेश मोरजकर, लाड मित्रमंडळाचे सचिव संदीप नार्वेकर, कर सल्लागार समीर परब, चित्रकार तथा शिक्षक हंसराज गवळे, प्रवीण गाड, युनिक फाउंडेशन सिंधुदुर्गच्या सचिव रीना मोरजकर, नैतिक मोरजकर, मानकरी संजय सावंत आदी उपस्थित होते. यावेळी मंदिरात श्रीफळ ठेवून दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com