कृषी विद्यापीठात रक्तदान शिबिर
कृषी विद्यापिठामध्ये
रक्तदान शिबिर
दापोली ः कृषी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्रसेना, वनशास्त्र महाविद्यालय व न. का. वराडकर महाविद्यालयातर्फे रक्तदान शिबिर झाले. शिबिराचे उद्घाटन कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या हस्ते झाले. शिबिरामध्ये १३८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या वेळी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता मकरंद जोशी, कृषी मृद व रसायनशास्त्र प्रमुख डॉ. मनिष करतुरे, सहयोगी छात्रसेना अधिकारी हेमंत बोराटे, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक आणि राष्ट्रीय योजनेचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी संतोष वरवडेकर उपस्थित होते.
---
डीबीजेच्या निवासी
शिबिराची सांगता
चिपळूण : राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबिरात विद्यार्थ्यांना चार भिंतींबाहेरील शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, स्वयंशिस्त, सामाजिक जाणीव, स्वावलंबन यासारख्या मूल्यांची रूजवणूक शिबिरातून होते, असे प्रतिपादन डीबीजे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट यांनी केले. डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या चिंचघरी (गणेशवाडी) येथे आयोजित ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबिराच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जोहा ममतुले, नीशा आडविलकर, ऋतांश कदम, सृष्टी वेल्हाळ, राधा चितळे, सानिया नरळकर, साईराज बुरंबाडकर, स्नेहल शिंदे, वैभवी सोलकर, प्रतीक साळवी, रोहित काताळे या विद्यार्थ्यांचा व राजमाता जिजाऊ गटातील सर्व विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल विविध पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
---
गवळीवाड्यात आज
पालखी मिरवणूक
रत्नागिरी ः शहरातील गवळीवाडा मित्रमंडळाचा दत्त जयंती उत्सव समितीच्या दत्त जयंती उत्सवाला सुरवात झाली असून, विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवारी (ता. १२) सकाळी नित्याची पूजा, लघुरूद्र आणि सायंकाळी सहा वाजता भजन व रात्री आठ वाजता विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाले. १३ ला नित्यपूजा, सायं. सहा वा. भजन व रात्री ८ वा. सुपर डान्स शो झाला. शनिवारी (ता. १४) सकाळी नित्यपूजा, सायं. ५ वा. सुश्राव्य कीर्तन, ६.३९ ला श्रींचा जन्मोत्सव व पालखी मिरवणूक. रात्री आठ वाजता लहान मुलांच्या स्पर्धा. १५ ला रात्री ८ वा. हिंदी, मराठी सुमधूर गीतांचा कार्यक्रम कोल्हापूर येथील ऑकेस्ट्रा, १६ला महाप्रसाद होणार आहे. कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गवळीवाडा मित्रमंडळ व दत्त मंदिर उत्सव समितीचे अध्यक्ष अॅड. विजय पेडणेकर व खजिनदार राजेंद्र कीर यांनी केले आहे.
-------
कमलशहा साई महाराज
बाबांचा आज उरूस
रत्नागिरी ः शहरातील मांडवी किनारी व रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी श्री कमलशा साई महाराज उर्फ पीर कमालुद्दीन शहा बाबांचा उरूस शनिवारी (ता. १४) होणार आहे. हा दर्गा ब्रिटिशकालीन १९४२ पूर्वीचे हिंदू -मुस्लिमांचे सर्व धर्माच्या ऐक्याचे प्रतीक आहे. दर्ग्यातील वार्षिकोत्सव म्हणजे उरूसाच्या दिवशी रात्री हजारो लोक समाधी दर्शनास येतात. मुस्लिम बांधव भाटकर वाड्यातील मशिदीतून रात्री आठ वाजता मोठ्या संख्येने बाबांच्या समाधीवर मजार चढवतात. रात्री सव्वादहा वाजता तसेच किल्ला मशिदीतून हौशी कलावंतातर्फे ही गलीप, चद्दर, फूल, जाळी, निशाण, नारळ, धूप, अगरबत्ती, अत्तर आदी चढवण्यास येतात. भाविकांनी या उरूसाला उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापक भालचंद्र चेऊलकर व संयोजकांतर्फे करण्यात येत आहे.
-----
बँक ऑफ इंडियातर्फे
समझौता दिवसा
रत्नागिरी : मागील महिन्यात आयोजित केलेल्या समझोता दिवसाला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे बँक ऑफ इंडिया, रत्नागिरी यांच्यातर्फे सर्व शाखांत आणि विभागीय कार्यालयात निष्क्रिय (NPA) कर्ज खातेदारांसाठी एकरकमी तडजोड योजनेअंतर्गत त्यांची निष्क्रिय (NPA) कर्जखाती भागवण्याकरिता १६ ते २१ पर्यंत समझोता दिवसाचे आयोजन केले आहे. हा दिवस विशेषतः अशा एनपीए कर्जदारांसाठी आहे जे कर्जदार वैद्यकीय परिस्थितीमुळे, इतर परिस्थितीजन्य कारणांमुळे कर्जाची परतफेड वेळेत करू शकले नाहीत व त्यामुळे सदर खाती एनपीएत आहेत अशांसाठी ही संधी आहे. या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

