-तवसाळच्या महामाई मंदिराचा जीर्णोद्धार अंतिम टप्प्यात
-rat१३p२३.jpg-
P२४N३१४१३
गुहागर ः तवसाळ येथील महामाई मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
-------
तवसाळच्या महामाई मंदिराचा
जीर्णोद्धार अंतिम टप्प्यात
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १३ : तालुक्यातील तवसाळ येथील श्री महामाई सोनसाखळी मंदिरात देवदिवाळीनिमित्त उत्सव-जागर सोहळा झाला. या वेळी विविध ठिकाणाहून आलेल्या भक्तांना जीर्णोद्धाराच्या अंतिम टप्प्यासाठी मदत करण्याचे आवाहन देवस्थानच्यावतीने करण्यात आले.
तवसाळ गावातील पंचक्रोशीचे मंदिर म्हणून ओळख असलेल्या श्री महामाई, सोनसाखळी, श्री देव रवळनाथ, त्रिमुखी, सोमजाई मंदिरात देवदिवाळीचा जागर उत्सव मोठ्या आनंदात झाला. या उत्सवापूर्वी मंदिराला रंगरंगोटी करून आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. या निमित्ताने तवसाळ पंचक्रोशीतून पूर्वीच्या काळी निघून गेलेले भक्तगण आपल्या कुटुंबीयांसमवेत ग्रामदेवतेच्या दर्शनाला आले होते. त्याचप्रमाणे देशाच्या, राज्याच्या विविध भागात राहणारी तवसाळ गाव असणारी कुटुंबेही गावी आली होती. हजारो भाविकांनी दर्शनासाठी ग्रामदेवतेच्या मंदिरात गर्दी केली होती. पंचक्रोशीतील विविध भजन मंडळींनी आपली सेवा अर्पण केली.
महामाई, सोनसाखळी, श्री देव रवळनाथ, त्रिमुखी, सोमजाई मंदिराचा जीर्णोद्धार दोन वर्ष सुरू आहे. आता मंदिराचे रूप पालटले असून, अजून थोडे काम बाकी आहे. त्यामुळे मंदिराच्या अंतिम टप्प्यातील कामासाठी भाविकांनी सढळ हस्ते मंदिराला मदत करावी, असे आवाहन देवस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

