वंचितच्या अण्णा जाधवांसह १५० जणांवर गुन्हा

वंचितच्या अण्णा जाधवांसह १५० जणांवर गुन्हा

Published on

अण्णा जाधवांसह १५० जणांवर गुन्हा

जमाबंदीचे उल्लंघन; मोर्चामुळे कार्यकर्ते अडचणीत
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ ः वंचित बहुजन आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास (अण्णा) जाधव यांनी नरवण येथे झालेल्या हल्ल्याच्या विरोधात गुढेफाटा ते बहादूरशेखनाका चिपळूण-उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयावर गुरूवारी मोर्चा काढला. या मोर्चाच्या आयोजनास उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांनी परवानगी नाकारली होती. तरीही जमाबंदी आदेशाचे उल्लंघन करून अण्णा जाधव व सहकाऱ्यांनी मोर्चा काढल्याने एकूण १५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुहागर तालुक्यातील नरवण येथे १७ नोव्हेंबरला दुपारी अण्णा जाधव यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्यासंदर्भात चार संशयितांना अटक करण्यात आली असून, अन्य संशयितांचा पोलिस पथक कसून शोध तपास घेत आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी रत्नागिरी यांनी मनाई लागू केलेला असून, अशावेळी मोर्चाचे आयोजन केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने मोर्चाच्या आयोजनास दिलेली परवानगी उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांनी नाकारली होती. तरीही पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला; मात्र या मोर्चाकडे स्थानिक समाजबांधवांनी पाठ फिरवल्याने फारसा प्रतिसाद लाभला नाही. या प्रकरणी आदेशाचे उल्लंघन केल्याने विकास उर्फ अण्णा जाधव, गीता विकास जाधव, ॲड. सर्वजीत बनसोडे, संतोष पवार (रा. झोंबडी, ता. गुहागर), नितीन जाधव, प्रतीक गमरे, सुषमा गमरे, सुनील जाधव, बबन गमरे यांच्यासह प्रमुख सुमारे १५० कार्यकर्त्यांवर चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

.............नागेश पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com