परवानगी नाकारली असताना मोर्चा कसा काढला0
-ratchl१३२.jpg
P२४N३१४५३
ः चिपळूण ः पोलिसांना निवेदन देण्यासाठी जमलेले महाविकास आघाडीचे पदाधिकारी.
-------------------
परवानगी नसताना मोर्चा कसा काढला?
महाविकास आघाडी ; आदेश मोडणाऱ्यावर कारवाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ ः वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी चिपळुणात आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात मोर्चा काढला. जिल्ह्यात मनाई आदेश लागू असताना तसेच प्रांताधिकारांनी मोर्चाला परवानगी नाकारली असताना मोर्चा कसा काढला? पोलिसांनी वेळीच मोर्चा का रोखला नाही? असा जाब येथील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विचारला. मोर्चाप्रकरणी कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन प्रांताधिकारी आकाश लिगाडे व चिपळूण पोलिस निरीक्षकांना देण्यात आले.
शुक्रवारी सकाळी भास्कर जाधव यांचे समर्थक चिपळूण प्रांताधिकारी कार्यालयासमोर जमा झाले. यानंतर त्यांनी प्रांत आकाश लिगाडे यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, १२ डिसेंबरला वंचित संघटनेतील अण्णा जाधव यांनी गैरसमजुतीने आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात मोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांनी जाधव यांच्या विरोधात असंविधानिक भाषेत शिवीगाळ केली. महिनाभर सातत्याने ते सोशल मीडिया, प्रसारमाध्यमे, वर्तमानपत्रातून खोटे आरोप केले जात आहेत. आरोप करणाऱ्यांच्या बाबतीत पोलिस यंत्रणेने गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे १२ रोजीच्या मोर्चामध्ये अर्वाच्च भाषा वापरण्यात आली. यापुढे जाधवांच्या बदमानीचा प्रयत्न झाल्यास आम्हाला देखील या विरोधात सनदशीर मार्गाने प्रशासनाच्या विरोधात उतरावे लागेल.
मोर्चात दीडशेपेक्षा जास्त लोक सहभागी झाले होते. मात्र केवळ १०० ते १५० जणांवर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी चित्रीकरणाचा आधार घेऊन उर्वरित सर्वांवर गुन्हा दाखल करावा, मोर्चामध्ये चिपळूणबाहेरून आलेल्या लोकांचा सहभाग होता. अशा लोकांमुळे चिपळुणातील कायदा व सुव्यवस्था बिघडून जातीय सलोखा बिघडवण्याचे प्रयत्न होत आहेत. यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करत याबाबत गांभीर्याने दखल न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव, बाळा कदम, विनोद झगडे, शशिकांत मोदी, बळीराम शिंदे, जितेंद्र चव्हाण, संदीप चव्हाण, फैसल कासकर, मोहन मिरगल, बाळा अंबुर्ले, धनश्री शिंदे, दीप्ती सावंतदेसाई, सतीश शिंदे, उमेश खताते आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

