मंडणगडमध्ये रात्री इंजेक्शन देऊन पशुधनाची चोरी

मंडणगडमध्ये रात्री इंजेक्शन देऊन पशुधनाची चोरी

Published on

Rat१३p२६.jpg, rat१३p२७.jpg -
२४N३१४४५,P२४N३१४४६
भिंगळोली ः रात्री गुरे चोरी करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले दृश्य व घटनास्थळी उभी असणारी मोटार.

मंडणगडमध्ये इंजेक्शन देऊन पशुधनाची चोरी

आलीशान गाडीचा वापर ; गेली १० वर्ष गायी-गुरे होतात गायब

सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १३ ः मंडणगड शहरालगत असणाऱ्या रहदारीच्या ठिकाणी भिंगळोलीमध्ये रात्री चारचाकी गाडीतून बसलेल्या गाईगुरांना भुलीचे इंजेक्शन व खाद्यातून भूल देऊन त्यांची चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुरे चोरून नेण्यावेळी चोरट्यांनी आलीशान कारचा वापर केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ही घटना ६ डिसेंबरला रात्री बारा वाजण्याच्या सुमारास भिंगळोली ते धुत्रोली मार्गावर एका दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंडणगड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रारी दाखल केल्या आहेत.
मंडणगड तालुक्यामधून काही वर्षांपासून फिरते पशुधन गायब होण्यामध्ये वाढ झाली आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसून येणाऱ्या चित्रीकरणानुसार रात्री बाराच्या दरम्यान एक कार येऊन थांबते व रस्त्यालगत बसलेल्या गाईगुरांना त्यांचे लक्ष नसताना या गाडीतून उतरलेला तरूण इंजेक्शन देताना स्पष्ट दिसून येतो. घाबरून ही गाईगुरे जात असताना त्यांना थांबवण्यासाठी दुसरा हातातील पिशवीतून काही खाद्यपदार्थ फेकतो. यानंतर ही जनावरे त्याच ठिकाणी धुंद अवस्थेत बसलेली दिसून येतात. यानंतर कार बसलेल्या गाईगुरांच्या ठिकाणी लावून त्यातून उतरलेल्या व्यक्ती या गाडीमध्ये गुरे भरण्याचा प्रयत्न करतात. गुरे गाडीत भरल्यानंतर हे चोरटे त्या ठिकाणाहून पसार होताना दिसून येतात. याच ठिकाणी पहाटे चार वाजेपर्यंत हा शिरस्ता कायम राहिल्याचे दिसून येते. अंतराअंतरानंतर गाडी येऊन या रस्त्यालगत बसलेल्या गाईगुरांना गाडीमध्ये भरून पसार होताना दिसून आले.
---
घटनांचा परस्परसंबंध?
या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी ७ डिसेंबरला तालुक्यातील नारगोली परिसरामध्ये शेतात जनावरांच्या मांसाचे तुकडे आणि रक्त पडल्याचे आढळून आल्याचे येथील नागरिकांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. ६ डिसेंबरला सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला प्रकार आणि ७ डिसेंबरला नारगोली परिसरामध्ये घडलेल्या घटनेचा परस्परसंबंध आहे का, याबाबत संशय व्यक्त होत आहे.
---
कोट
सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली गाय माझी आहे. आतापर्यंत माझी तीन जनावरे गायब झाली आहेत. याबाबत पोलिसांसहित सर्व राजकीय पुढारी व्यक्तींना अवगत करत न्यायाची मागणी केली आहे. माझ्यासहित अनेक शेतकरी न्याय मिळेल, या अपेक्षेत आहेत.
- बबन जाधव, भिंगरोळी
-------------------
कोट
घटनेसंदर्भात पोलिसांचा तपास सुरू असून, अन्य सीसीटीव्ही फूटेज तपासणी करण्यात येत आहेत. नारगोली ठिकाणी पाहणी केली असून, घडलेल्या घटनेचाही तपास सुरू आहे.
- नितीन गवारे, पोलिस निरीक्षक मंडणगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com