परभणीतील घटनेप्रकरणी आमदार राणेंना निवेदन
31455
परभणीतील घटनेप्रकरणी
आमदार राणेंना निवेदन
सावंतवाडी, ता. १३ ः परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तिकेच्या विटंबनेच्या प्रकरणातील दोषीवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती तथा जिल्हा भाजप प्रवक्ते अंकुश जाधव यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी काल (ता. १२) आमदार नीतेश राणे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केले. सावंतवाडी दौऱ्यावर आलेल्या श्री. राणे यांची श्री. जाधव यांनी भेट घेऊन परभणी प्रकरणाबाबत चर्चा केली. या घटनेचा जलदगतीने तपास करून दोषीवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे श्री. जाधव यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील नागरिकांच्यावतीने या घटनेचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत आहोत. आमच्या भावना लक्षात घेऊन दोषीवर कडक कारवाई करावी, असे निवेदनात नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

