पान एक-फसवणूक प्रकरणात अटक
तृप्ती मुळीक अखेर निलंबीत

पान एक-फसवणूक प्रकरणात अटक तृप्ती मुळीक अखेर निलंबीत

Published on

फसवणूक प्रकरणात अटक
तृप्ती मुळीक अखेर निलंबित
सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक ः कोल्हापुरात दाखल तक्रार
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १३ ः कोल्हापूर येथील सुमारे ८५ लाखांच्या फसवणूक व जादूटोणा प्रकरणी अटक झालेल्या सिंधुदुर्ग पोलिस दलातील वाहन चालक तृप्ती मुळीक हिचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आज निलंबन केले. मुळीक ही उपमुख्यमंत्री अजित पवारांसह व्हीआयपी व्यक्तींच्या डीव्ही कारचे चालक म्हणून काम केल्याने प्रकाशझोतात आली होती. तिला कोल्हापूर येथील न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिल्यानंतर ही निलंबनाची कारवाई केल्याचे जिल्हा पोलिसांतर्फे सांगण्यात आले.
गंगावेश कोल्हापूर येथील सुभाष हरी कुलकर्णी यांनी कोल्हापूर पोलिस ठाण्यात आपल्या झालेल्या फसवणुकीबाबत ३ नोव्हेंबरला तक्रार दाखल केली होती. यात एकूण नऊ संशयितांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सिंधुदुर्ग पोलिस अंमलदार असलेल्या तृप्ती संजय मुळीक (वय ३२, मूळ रा. दरवेश पाडळी, ता. हातकणंगले व सध्या रा. सिद्धिविनायक पार्क, दुसरा मजला ओरोस) हिच्यावर सहाव्या क्रमांकाची संशयित म्हणून गुन्हा नोंद झाला होता. तिच्यासह दीपक पाटणकर, अण्णा उर्फ नित्यानंद नायक, श्रीमती धनश्री काळभोर, शशिकांत गोळे, कुंडलिक झगडे, ओमकार पाटणकर, भारत पाटणकर, हरीश राऊत अशा संशयितांवर जादूटोणा, अघोरी प्रथा आदी संदर्भात ८४ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार होती. २४ लाख ८५ हजार किमतीचे सोन्याचे दागिने, दोन लाख ८० हजार किमतीचे चांदीचे दागिने व किमती वस्तू, ५४ लाख ८४ हजार रोख रक्कम व आरटीजीएस रक्कम, दोन लाखांचे लाकडी व किमती सामान व वीस हजार किमतीची परवाना बंदूक, अशी रोख रक्कम व दागिन्यांसह किमती सामान फसवणूक करून दबाव टाकून घेतल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. या प्रकरणी तृप्ती मुळीक हिला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने तिला १४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. तीन दिवसांच्या कोठडीमुळे, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या कायदेशीर तरतुदीनुसार तिचे निलंबन करण्यात आल्याचे जिल्हा पोलिसांतर्फे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com