-जैतापूरमध्ये सोमवारपासून प्राथमिक शाळा बंद

-जैतापूरमध्ये सोमवारपासून प्राथमिक शाळा बंद

Published on

जैतापुरात सोमवारपासून शाळा बंद
व्यवस्थापन समितीसह पालकांचा निर्णय ; शिक्षकांची वारंवार बदली
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १३ ः जिल्हा परीषद शाळा जैतापूर नं. १ शाळेत कामगिरीवरील शिक्षक वारंवार बदलून दिला जात आहे. त्यामुळे पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून वारंवार विनंती करूनही कायमस्वरूपी शिक्षक दिला जात नाही. त्यामुळे १६ डिसेंबरपासून शाळा बंद आंदोलन करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी आणि पालकांनी घेतला आहे. याबाबतचे निवेदन राजापूर गटशिक्षणाधिकारी आणि आमदार किरण सामंत यांना देण्यात आले आहे .
जिल्हा परिषद शाळा जैतापूर नं. १ या सेमी इंग्रजी शाळेत पूर्णवेळ शिक्षक आणि एक सहाय्यक शिक्षक आवश्यक असतानाही गेले काही महिने केवळ एक कामगिरीवरील शिक्षक कार्यरत आहे. तो अदलून बदलून येत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे वारंवार विनंती करूनही कायमस्वरूपी शिक्षक दिला जात नाही. पालकांसह जैतापूरचे सरपंच यांनी प्रत्यक्ष भेटून प्रशासनाला विनंतीही केली होती. त्या वेळी चार-पाच दिवसात दोन शिक्षक देतो, असे तोंडी सांगितले होते; मात्र अद्यापपर्यंत त्या शाळेला शिक्षक दिला गेलेला नाही. याबाबत पालकांची आज सभा झाली. त्यामध्ये चर्चा करून सोमवारपासून शाळा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळेला दोन शिक्षक देण्याचे लेखी पत्र मिळाल्यास आंदोलन स्थगित करण्यावर फेरविचार करू केला जाईल, असेही ठरवण्यात आले आहे. यावर प्रशासन काय तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com