म्हापणमध्ये जानेवारीत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

म्हापणमध्ये जानेवारीत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

Published on

म्हापणमध्ये जानेवारीत
क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
म्हापणः येथे श्रीराम आयलंड ग्रुप श्रीरामवाडी मैदानावर ८ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश फी ४००० असून अनुक्रमे ५१ हजार व चषक, २५ हजार व चषक व उपांत्य फेरीत पराभूत संघाला प्रत्येकी ७ हजार व चषक अशी बक्षिसे आहेत. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, यष्टिरक्षक, क्षेत्ररक्षक, आदर्श संघ, अंतिम सामना सामनावीर, मालिकावीर यांच्या साठी वैयक्तिक स्वरुपात पारितोषिक ठेवण्यात आली आहेत. नावनोंदणी अंतिम तारीख ४ जानेवरी आहे. संघाची नाव नोंदणी करताना २००० आगावू रक्कम द्यावी लागणार आहे. इच्छुकांनी शैलेश कोचरेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रथम नोंदणी करणाऱ्या १६ संघाना या स्पर्धेत प्रवेश दिला जाईल.
-------------
शिरगांव हायस्कूलसाठी
पाळेकर-दळवींतर्फे देणगी
देवगडः तालुक्यातील शिरगांव हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीमधील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी सौ. आरती पाळेकर-दळवी यांनी पाच हजार रूपये रोख स्वरूपात देणगी दिली. जुनमध्ये जाहीर केल्यानुसार ही देणगी शाळेचे माजी वरिष्ठ लिपिक व कुवळे शाळा समितीचे सदस्य दिलीप पाळेकर यांचे हस्ते शाळेकडे जमा करण्यात आली. या देणगीबद्दल प्राचार्य शमसुद्दीन आत्तार आणि संस्था पदाधिकार्‍यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
..................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com