वामनराव महाडिकची ''आये'' एकांकीका तृतीय

वामनराव महाडिकची ''आये'' एकांकीका तृतीय

Published on

31494

वामनराव महाडिकची ‘आये’ एकांकीका तृतीय
मुंबईत स्पर्धाः ४० संघांमधून मिळविले यश
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १३ः जे. ई. एस. शिक्षण संकुल जोगेश्वरी (पूर्व) मुंबई येथील जोगेश्वरी एज्युकेशन सोसायटी आयोजित (कै.) विकास धुमे स्मरणार्थ जे. ई. एस. करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या ‘आये’ या एकांकिकेने तृतीय क्रमांक मिळवीत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
स्वतःला विसरून मुलांना घडविणारी, त्यांच्यावर संस्कार करणारी असते ती आई. मुलांचे आयुष्य मार्गी लागावे म्हणून अहोरात्र झटणारी व्यक्ती म्हणजे आई. आणि हाच विषय घेऊन वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळेरे प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय मराठी बालनाट्य स्पर्धेत सहभाग घेत यश खेचून आणले. या स्पर्धेत राज्यभरातून जवळपास ४० एकांकिका संघ स्पर्धेसाठी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे ग्रामीण भागातून सहभागी होणारी एकमेव एकांकिका ही वामनराव महाडिक हायस्कूलची होती.
या एकांकिकेत प्रशालेतील शमिका ढेकणे, मयुरेश जठार, श्रेया कुट्रे, सलोनी तोरस्कर, रक्षा भोगले, हर्षिता तडवी, प्रेरणा तळेकर, वेदिका भोगले, अनुष्का चव्हाण, मयुरेश तळेकर, प्रथम तळेकर, दिव्यांशू पिसे, ईश्वरी खटावकर, मयूर मेस्त्री, शुभम साटम, आर्यन पांचाळ, तपस्वी नाईकधुरे, सत्यवान गावकर, वेदांत जंगले, शैलेश बडमे, राज घाडी हे विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेतील यशाबद्दल संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर, शाळा समिती चेअरमन अरविंद महाडिक, प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर, सर्व शाळा समिती सदस्य, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद, पालक ग्रामस्थ, माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन करत या नाटिकेच्या अंतिम फेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
-------------
चौकट
लक्षवेधी अभिनय
या एकांकिकेमध्ये प्रमुख ''आये''ची भुमिका करणारी शमिका ढेकणे व मुलाची भुमिका करणाऱ्या मयुरेश जठार यांच्या विशेष लक्षवेधी अभिनयामुळे त्यांना नैपुण्य पदक प्राप्त झाले आहे. या प्रशालेला नेहमी सहकार्य करणारे लेखक, दिग्दर्शक शेखर गवस यांच्या प्रयत्नामुळे ही एकांकीका राज्यस्तरीय स्पर्धेत यशस्वी ठरली. या स्पर्धेची अंतिम फेरी २५ डिसेंबरला मुंबई येथे पार पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com