क्राईम

क्राईम

Published on

धूमस्टाईलने एसटी चालवणाऱ्या
चालकावर प्रवाशांचा आक्षेप

चिपळूण मधील प्रकार ; चालकाच्या ग्वाही नंतर अखेर गाडी रवाना
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ : कुर्ला बेस्ट बस प्रकरण ताजे असतानाच मुंबई ते चिपळूण दरम्यान चालकाने ‘धूमस्टाईल एसटी चालवत आणल्याचा प्रकार आज पुढे आला आहे. संतापलेल्या प्रवाशांनी ती बस चिपळूण आगारात अर्धा तास बस थांबवून ठेवत व्यवस्थापकांकडे चालकाच्या या प्रतापाची तक्रार केली. हा प्रकार भिंवडी-रत्नागिरी एस.टी बस मध्ये आज सायंकाळी घडला. चालकाने आपली चूक मान्य करीत, पुढचा प्रवासात बसची गती योग्य ठेवतो, अशी ग्वाही दिल्यानंतर ती बस पुढील प्रवासासाठी रवाना झाली.
भिवंडी आगारातून सुटलेली भिवंडी-रत्नागिरी ही बस सायंकाळी चिपळूण आगारात आली. यावेळी सुटकेचा नि:श्‍वास टाकत एक प्रवासी धावतच थेट चिपळूण आगार व्यवस्थापकांच्या केबिनमध्ये गेला. बस चालक अतिवेगात एस.टी चालवत आहे. मार्गावरचे चढ, उतार, वळणावरही तो सुसाट गाडी चालवतो आहे. यामुळे आमच्या प्रवाशांच्या पोटात गोळा आला असून एखादा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? प्रवासी जीव मुठीत घेऊन इथवर आले आहेत. पुढे काय होईल, काहीच कल्पना नाही. तुम्ही दुसरा चालक द्या, अशी विनवणी त्या प्रवाशाने आगार व्यवस्थापक श्री. चव्हाण यांच्याकडे केली. बस मधील अन्य प्रवासीही चालकाच्या अशा वागण्याने संतापलेले होते. या तक्रारीची तत्काळ दखल घेत चव्हाण यांनी भिवंडी-रत्नागिरी एसटीचे चालकाला बोलवून घेतले. त्यांचा जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. भिवंडी आगारातील वरिष्ठांकडेही त्याची तक्रार केली. अखेर त्या चालकाने आपली चूक झाल्याचे कबुल केले. मी या मार्गावर पहिल्यांदाच आलो आहे. पुढे सावकाश एस.टी नेईल, अशी ग्वाही दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com