

-rat५p२८.jpg-
२५N३६६२७
पावस ः स्पोर्ट्स कीट देणाऱ्या देणगीदारांचे सत्कार करताना मुख्याध्यापक सुभाष काटकर, मंगेश म्हादये, प्रकाश खरडे, गोकुळ खरडे, चंद्रशेखर पेटकर.
----------
मेर्वी शाळेतील विद्यार्थ्यांना ‘स्पोर्ट्स कीट’
पावस, ता.७ ः रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी मराठी शाळेतील ४० विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स कीट शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश म्हादये यांच्या प्रयत्नाने शैक्षणिक उठावांतर्गत देण्यात आले.
खरडेवाडी कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक मंडळातर्फे विश्वनाथ नवाले, प्रकाश खरडे, गोकुळ खरडे यांनी वीस स्पोर्ट्स कीट वीस विद्यार्थ्यांना दिले. गणेश तरुण मंडळ वरची म्हादयेवाडी यांच्या वतीने दिगंबर सुरेश म्हादये यांनी दहा विद्यार्थ्यांना दहा स्पोर्ट्स कीट दिली. वैभव राजाराम खरडे यांनी दहा विद्यार्थ्यांना दहा स्पोर्ट्स कीट दिली. या वेळी मेर्वी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष काटकर, शिक्षिका सौ. शर्वरी करगुटकर, उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर, उपशिक्षिका संजया पावसकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश म्हादये, खरडेवाडी कला क्रीडा मंडळाचे प्रकाश खरडे, गोकुळ खरडे, सूर्यकांत मांडवकर, विनायक खरडे उपस्थित होते.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.