

swt613.jpg
36804
तळवडेः कलारंग महोत्सवातील विजेत्यांसह मान्यवर.
‘कलारंग’ महोत्सवाला
तळवडे येथे प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
मळेवाड, ता. ७ः तळवडे श्री सिद्धेश्वर मंगल कार्यालय येथे श्री सिद्धेश्वर ग्रामोत्कर्ष मंडळ तळवडे यांच्यावतीने कलारंग महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी तळवडे गावातील सर्व प्राथमिक शाळांनी व हायस्कूलनी सहभाग दर्शविला. यावेळी समूहगीत स्पर्धा व एकपात्री स्पर्धा घेण्यात आली. यातील विजेत्या मुलांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. महोत्सवाचे उद्घाटन सूरज परब, नारायण परब, मंडळाचे अध्यक्ष रवींद्र सावंत, सचिव महेश परब, विलास नाईक, रवींद्र काजरेकर, प्रशांत पडते, रामचंद्र जाधव, विनोद वराडकर, आपा परब, योगेश सावंत, दिनेश परब, बबन काळे, बाळू मांद्रेकर, चंद्रकांत शेटकर उपस्थित होते.
..............
swt615.jpg
36805
कोल्हापूरः ‘द इंडियन एज्युकेशन’ पारितोषिक स्वीकारताना शिक्षक उदय गवस.
शिक्षक उदय गवस यांना
इंडियन एज्युकेशन पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ७ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळयेचे शिक्षक उदय गवस यांना कोल्हापूर येथील ‘आई’ संमेलनामध्ये वेद फाउंडेशनच्यावतीने ‘द इंडियन एज्युकेशन अवॉर्ड २०२४’ ने सन्मानित करण्यात आले. समृद्धी प्रकाशन व वेद फाउंडेशनच्यावतीने विविध क्षेत्रात लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
श्री. गवस यांना कला व शैक्षणिक कार्यातील गौरवासाठी २०२४ या वर्षीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या त्यांच्या यशाबद्दल विविध स्तरांतून कौतुक होत आहे. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सूर्याजी झेंडे, उपाध्यक्ष उत्तम दळवी तसेच सर्व पालकांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे. या कार्याबद्दल केंद्रप्रमुख सूर्यकांत नाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.